राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी च्या अर्धवट कामामुळे रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुका व आढळगावं ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात..!
श्रीगोंदा, ता. ९ : निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुका व आढळगावं ग्रामस्थ यांनी श्रीगोंदा तहसीलदार यांना महामार्गाच्या अपूर्ण कामासंदर्भात निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी आढळगावं ते जामखेड हा रस्ता आढळगावं गावठाण व पुढील गावांमध्ये ठीकठिकाणी अपूर्ण अस्थेत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये २० ते २५ लोकांचे बळी जाऊन कित्येक लोकांना अपंगत्व आले आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये रस्ता खोदून ठेवल्या मुळे आढळगाव परिसरात धुळीचे प्रमाण वाढले आहे.
अपूर्ण गटार लाईन मुळे पाणी साचून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन साथीच्या रोगाचे व धुळी मुळे श्वसनाच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे, व त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा रस्त्यालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळा व उच्च माध्यमिक शाळा मधील मुलांना व
परिसरातील नागरिकांना होत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. तरी आपण याची आपल्या पातळीवर दखल घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना हे काम त्वरित चालु करुन पुर्ण करण्याचे आदेश द्यावेत.
अन्यथा निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुका व आढळगावं ग्रामस्थ १६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा. आढळगावं बस स्टँड समोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला.