तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचा आलेख वाढत आहे. या विद्यालयाचे विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनियर, आयटी, एमपीएससी, यूपीएससी अश्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेताना पाहायला मिळत आहेत..!
श्रीगोंदा, ता. १० : शहरातील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचालित कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल व शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स स्कूल च्या विद्यार्थ्यानी कला, क्रीडा, अबॅकस,विज्ञान,रोलर स्केटिंग अशा विविध स्पर्धांमध्ये उंच गगनभरारी घेत घवघवीत यश संपादन केले.
नुकतीच अहिल्यानगर येथे जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा पार पडली. यामध्ये यश खाकाळ याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. स्वयम भोसले या विद्यार्थ्यांने सुवर्णपदक (बेस्ट स्केटर) पटकावले. तेजस्विनी ढवळे, आर्यन ढेंबरे, आर्यन लकडे, वरद डगळे, अमीर पठाण, रोनीत फुलपगार यांनी कांस्यपदक पटकावले.
स्पर्धेच्या युगात कमीत कमी वेळेत गणितीय बेरीज,वजाबाकी,गुणाकार भागाकार करत आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी अबॅकस कार्यप्रणालीचा उपयोग केला जातो. २०२४ मध्ये अहिल्यानगर मध्ये झालेल्या युनिव्हर्सल अबॅकस अँड वैदिक मॅथ असोसिएशन स्टेट लेवल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये राजनंदिनी भोसले व शिवम खोमणे यांनी चौथा क्रमांक मिळवला. वेदिका सुपेकर, तनिष्का खेतमालीस,स्वरूप हिरवे, शिवदीप लोहगावकर, आरव लोखंडे, विघ्नेश चव्हाण या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
जिल्हास्तरीय विज्ञान अध्यापक संघ आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परीक्षामध्ये तालुकास्तरीय स्पर्धेत मृणाल डागले, प्रणव तावरे, तनिष बोरा, विराज शेलार याना प्रथम क्रमांक मिळाला.
काठमांडू, नेपाळ येथे ९ ते १० नोव्हेंबर रोजी झालेल्या इंडियन आर्ट अँड कल्चरल गव्हरमेंट ऑफ इंडिया यांच्यावतीने झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेमधून प्रज्ञां हनुमंत शिंदे या विद्यार्थिनीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. सदर स्पर्धेत प्रज्ञाने सेमी क्लासिकल बॉलीवूड मिक्स डान्स सादर करीत ज्युनियर कॅटेगिरी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच तिला “नृत्यसाधना” या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर विद्यालयाचे कोरिओग्राफर प्रणाली व सुमेध गजभिये यांना “कलासाधना” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे मुख्याध्यापिका नीतू दुलानी,विज्ञान शिक्षक योगेश सागडे, राहुल कोऱ्हाळे, कराटे शिक्षक जयेश आनंदकर, क्रीडा शिक्षक कैलास ढवळे, रोहित दानवे, राजश्री नागवडे, अबॅकस शिक्षक वैष्णवी चिंचकर, सुजाता पाचपुते यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा तसेच स्पर्धा परीक्षासाठी विद्यार्थी तयार करणे हेच आमचे ध्येय आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न बनायला हवा. यासाठी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचा आलेख वाढत आहे. या विद्यालयाचे विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनियर, आयटी, एमपीएससी, यूपीएससी अश्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेताना पाहायला मिळत आहेत. असे मत निरीक्षक एस.पी. गोलांडे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले.