तालुक्यातील असंख्य जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश झालेले नाहीत, याचा पाठपुरावा करूनही सदर प्रकरणे प्रलंबित आहेत ही बाब प्रकर्षाने वंचित बहुजन आघाडीने चव्हाट्यावर आणली असून तहसील प्रशासनाचे लक्ष वेधले आहे..!
श्रीगोंदा, ता. १० : श्रीगोंदा तहसील प्रशासनाच्या दिरंगाई कारभारावर विविध संघटना आक्रमक होत असताना तालुक्यातील जन्म-मृत्यू नोंदी बाबत वंचित बहुजन आघाडीने निवेदन सादर केले असून आठ दिवसात जन्म-मृत्यू नोंदीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढली नाही तर तहसील च्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला दिला आहे.
शासन नियमानुसार तहसील कार्यक्षेत्रातील जन्म-मृत्यू जबाबत किमान १ वर्षाच्या आत न केलेली नोंदणी बद्दल निबंधक किंवा ग्रामसेवक यांना त्या नोंदी बाबत कायदेशीर पूर्तता करण्यासाठी २ साक्षीदाराचे सहीनिशी प्रतिज्ञापत्र घेऊन इतर योग्य ती पूर्तता करून घेऊन त्याबाबत आदेश देण्याचे अधिकार १ नोव्हेंबर २०२३ रोजी दिलेले असताना तालुक्यातील असंख्य जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश झालेले नाहीत, याचा पाठपुरावा करूनही सदर प्रकरणे प्रलंबित आहेत ही बाब प्रकर्षाने वंचित बहुजन आघाडीने चव्हाट्यावर आणली असून तहसील प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
तालुक्यातील जन्म नोंदी रखडल्यामुळे अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून मृत्यूच्या नोंदीच्या दिरंगाई मुळे वारस नोंदी मिळकती बाबत गैरसोय होत असल्याने तहसील प्रशासनाने याला गांभीर्याने घ्यावे आणि सर्वच प्रलंबित प्रकरणे ८ दिवसात निकाली काढावीत अन्यथा तहसीलच्या दालनात उपोषण करण्या बाबतचे निवेदन सादर केले असून यावर मा. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सरपंच ऋषिकेश शेलार, तालुका अध्यक्ष प्रमोद उजागरे अँड.जठार आर एस,जुबेर शेख ,लक्ष्मण भोसले, प्रशांत पाटोळे, अँड.एस एच भोसले, अँड.नरेंद्र भोस ,मनोज रणदिवे आदि पदाधिकाऱ्यांच्या सह्या केल्या आहेत.