लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांनी तात्काळ रस्ता चालु करताना काम दर्जेदार करण्याबाबत लक्ष द्यावे असे सागितले, तर दिंरगाई झाल्यास आमदार, खासदार यांच्या दारात आक्रमक आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला..!
श्रीगोंदा, ता. ११ : तालुक्यातील आढळगाव तांदळी दुमाला ते टाकळी लोणार या रस्त्याचे काम किमान आठ महिन्यापासून दिरंगाईने आणि निकृष्ट दर्जाचे चालू असल्या बद्दल लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांनी वरिष्ठ स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करूनही अधिकारी आणि ठेकेदार झोपेत असल्याने आधुनिक लहुजी सेना व सरपंच उपसरपंच ग्रामस्थ आणि जयहिंद माजी सैनिक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अहिल्यानगर कार्यालयासमोर बेमुदत संबळ बजाव आंदोलन करण्यात आले.
या परिसरातील दळणवळण करण्याचे हेतूने हा रस्ता प्रमुख असून येथून शासकीय कामकाज, शैक्षणिक सुविधा, शेतकरी बाजारपेठ, ऊस वाहतूक, आरोग्यसेवा या मूलभूत सुविधा गतिमान करण्यासाठी या रस्त्याचे काम लवकर व दर्जेदार व्हावे ही महत्त्वाची बाब असताना आणि पावसाळ्यात अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये अपघाताला सामोरे जाणे ही नित्त्याची बाब असल्याने येथिल जनतेचा संयम सुटल्याने रस्ता प्रशासनाला जाग आणण्यासाठी संबळ बजाव आंदोलन केले असल्याचे आंदोलक लोकनियुक्त सरपंच संजय निगडे व जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले.
या संबळ बजाव आंदोलनाने कार्यालय परिसर दणाणला असुन अधिकारी भानावर येताच कार्यकारी अभियंता पी जी येळाई उपअभियंता कांबळे, खंडागळे यांनी आंदोलक ठेकेदार यांची समन्वय बैठक घेऊन तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले.
प्रसंगी बोलताना लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांनी तात्काळ रस्ता चालु करताना काम दर्जेदार करण्याबाबत लक्ष द्यावे असे सागितले. तर दिंरगाई झाल्यास आमदार, खासदार यांच्या दारात आक्रमक आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला.
या आंदोलनामध्ये प्रगतशील शेतकरी जयसिंग भोस ,यात्रा कमिटीचे अध्यक्ष संदीप शेठ रोडे, जय हिंद संस्थेचे मेजर निळकंठ उल्हारे ,आबासाहेब तोरडमल, मल्हारी खुडे ,ज्येष्ठ नेते नामदेव चांदणे , बापू कसबे,हिराबाई गोरखे , सुनिल सकट,दत्तात्रय गोरखे ,युवराज ससाने, शंकर ससाने, किशोर गाडे शिवप्रसाद शिंदे, आदि कार्यकर्ते सहभागी होते .