संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, दोषींना व माथे भडकवण्याचे काम करणाऱ्यांवर कडक शासन करा – वंचित बहुजन आघाडी वतिने निषेध व्यक्त करुन शासनाला निवेदन देण्यात आले.
श्रीगोंदा, ता. ११ : परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात दि. १० डिसेंबर २०२४ रोजी संविधानाच्या प्रतिमेचे अवमान व नासधूस करण्याची संतप्त घटना घडली आहे. या विषयाच्या अनुषंगाने संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, दोषींना व माथे भडकवण्याचे काम करणाऱ्यांवर कडक शासन करा – वंचित बहुजन आघाडीच्या वतिने निषेध व्यक्त करुन श्रीगोंदा पो. नि. किरणकुमार शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
सध्या देशात आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिधडवण्याचे काम होत आहे व सरकार कडुन अश्या घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक प्रयत्न होताना दिसुन येत नाहीत उलटपक्षी अश्या दोषींना पाठबळ देण्याचे काम होत असताना दिसत आहे यामुळे संविधान विरोधी शक्तींची हिंमत वाढत आहे. संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, दोषींना व माथे भडकवण्याचे काम करणा-यांवर कडक शासन करा” – वंचित बहुजन आघाडी वतिने निषेध व्यक्त करुन श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
यांप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक आयु. प्रसाद भिवसने, तसेच कार्यकर्ते आयु.रूपेश काळेवाघ, अभिजित उजगरे, जितेंद्र गायकवाड,परशुराम घोडके, नवनाथ रामफळे, विशाल सकट, भूषण भिवसने, सचिन पाडले उपस्थित होते.