श्रीगोंदा तहसीलदार डॉ.क्षितिजा वाघमारे यांचे कार्य प्रशासनाची विश्वासर्हता वाढवणारे – शरद पवळे

महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने कार्यसम्राट तहसीलदारांचा सन्मान

श्रीगोंदा ता. १२ : श्रीगोंदा तहसीलवर अनेक शेतकरी वर्षानुवर्ष शेतरस्त्यासाठी हेलपाटे मारत असताना महाराष्ट्र राज्य शिवापनंद शेतरस्ता समिती व श्रीगोंदा शेतरस्ता कृती समितीच्या माध्यमातून तहसीलला निवेदन देत आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले असता तहसीलदार डॉ. क्षितीजा वाघमारे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांची बैठक घेवुन शासणनिर्णयाप्रमणे तातडीचे ग्रामस्तरीय शेतरस्ता स्थापनेचे परिपत्रक काढत तातडीने शेतरस्ते खुले करण्याच्या कामी तारखा काढत कामाचा सपाटा लावत ब्रिटीशकालीन शिवपानंद शेतरस्ते खुले करण्याचे ऐतिहासिक कार्य मोठ्या जोमाने चालु केले

प्रसंगी आचारसंहितमुळे कामांना व्यत्यय आला तदनंतर तातडीने शेतकरी अधिकाऱ्यांची बैठक घेत पुन्हा प्रत्यक्ष शेतरस्ते खुले करण्याचे काम सुरू केले. महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने तहसीलदारांचा आज सत्कार करत पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीगोंदा शिव पानंद शेतरस्ताकृती समितीचे राजेंद्र नागवडे यांनी केले महाराष्ट्र राज्य चळवळीचे शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, शिरूर तालुका शेतरस्ता चळवळीचे रविंद्र सानप बापू , ॲड. कडूस पाटील सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके, वसंतराव जामदार आदींसह विविध मान्यवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी भुमि अभिलेख शिंगाडे साहेब,पोलिस प्रशासन उपनिरीक्षक संपत कन्हेरे साहेब, पंचायत समितीचे बनकर साहेब अधिकारी यांसह जालिंदर कातोरे, परेश वाबळे, वसंतराव जामदार, जितेंद्र मगर निलेश कुरूमकर,सतीश डेबरे,अनिल भुजबळ रामचंद्र विधाटे महेश भोसले सुनील पाचपुते बाळासाहेब जरांगे विशाल इथापे संजय खेतमाळीस आदी शेतकरी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता देण्याची जबाबदारी माझी..!
तालुक्यातील शेवटचा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबणार नाही नियमाप्रमाणे प्रत्येक शेतरस्ता खुला करून देणार यासाठी नागरिकांनी समन्वयाची भूमिका ठेवावी त्याचबरोबर श्रीगोंद्यातील प्रत्येक गावात ग्राम शेतरस्ता समिती स्थापन करणार असे कार्यक्रम प्रसंगी तहसिलदार डॉ. क्षितीजा वाघमारेंनी मत व्यक्त केले.

चौकट
ब्रिटिशकालीन शिव पानंद शेतरस्ते इतक्या वर्षाने खुले होत आहेत यासाठी तहसीलदार यांनी आदर्श काम उभे केले आहे त्यामुळे शेतकऱऱ्यांचीही जबाबदारी वाढली आहे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून प्रशासनाला सहकार्य करावे – दादासाहेब जंगले पाटील (महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे राज्य समन्वयक)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!