महात्मा फुले नूतन महाविद्यालयात मिरजगाव आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न..!

आंतर विभागीय मुलांच्या नेटबॉल स्पर्धा २०२४ ची सुरुवात संघर्षनामा मल्टीमीडिया चे मुख्य संपादक मेजर भिमराव उल्हारे व पत्रकार कु. उज्वला उल्हारे यांच्या उपस्थित ओळख परेड घेऊन सामन्याची सुरुवात करण्यात आली.

मिरजगाव, ता. १६ : येथील महात्मा फुले नूतन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय मुलांच्या नेटबॉल स्पर्धा दिनांक १3 व १४ डिसेंबर २०२४ रोजी पार पडल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागातील कक्षा अधिकारी शिवाजी उत्तेकर, माजी उप कुलसचिव मनोहर कुंजीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, यावेळी संघर्षनामा मल्टीमीडिया चे मुख्य संपादक मेजर भिमराव उल्हारे व पत्रकार कु. उज्वला उल्हारे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ओळख परेड घेऊन सामन्याची सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा ग्रामीण संघाने विजेतेपद तर पुणे शहर संघाने उपविजेते पद पटकावले. या स्पर्धेचा समारोप रुरल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. डॉ. महेंद्र चेडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून ऑल इंडिया पातळीवरील स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. तानाजी जाधव यांनी मानले.

या स्पर्धेसाठी निवड समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ. शैलेंद्र कांबळे प्रा.डॉ. विक्रम फाले प्रा. स्वप्निल करपे यांनी काम पाहिले तर पंच म्हणून डॉ. विकास दिघे अभिजीत सोनवणे अतुल खोमणे व हैदर अली यांनी काम पाहिले.

या स्पर्धा पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. राजेंद्रकुमार देवकाते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी वैभव पवार, हर्षद चौकडे, सलमान पठाण, सौरभ कांबळे, निखिल चिखले, कु. प्राची खराडे यांनी परिश्रम घेतले.

या स्पर्धा पार पाडण्यासाठी रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. ए. बी. चेडे संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.6 ° C
23.6 °
23.6 °
85 %
7.1kmh
100 %
Wed
23 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °
error: Content is protected !!