टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१७ सप्टेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्याचे युवा नेते साजन भैय्या पाचपुते यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेतली व साजन शुगर देवधैठण कारखान्या संदर्भात व शेतकरीहिताच्या गोष्टींची चर्चा करण्यात आली.
- या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत नवीन राजकीय भूकंप श्रीगोंदा तालुक्यात येईल का असे तर्क वितर्क लढवले जात आहेत.
यावर साजन पाचपुते यांच्याशी संपर्क साधला असता अशी कुठलीही शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले देवदैठण येथील साजन शुगर साखर कारखान्या संदर्भात व शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी संदर्भात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
स्त्रोत:(पत्रकार सचिन शिंदे)