आमचे तहसिलदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतरस्ते खुले करतील – जलज शर्मा

शेत तिथे रस्ता आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे परिपत्रक; नाशिककरांसाठी शिव पानंद शेतरस्ता चळवळीचा पेरू झाला गोड-शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटील

नाशिक, ता. २० : “पेरू वाटप”आंदोलनाची दखल घेत दोनच दिवसात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीचे परिपत्रक काढले.तालुका प्रशासनाला विहीत मुदतीत अहवाल सादर करण्याच्या सूचना देत दि.१६ डिसेंबरला पेरू वाटप आंदोलन होताच १८ डिसेंबरला शिवपानंद शेतरस्ते खुले करण्याचे परिपत्रक काढून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शेतकऱ्यांची मने जिंकल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी सांगितले

कुटुंबाचे विभाजन होत असलेने शेतीचे देखील विभाजन होत आहे. त्यामुळे क्षेत्र कमी कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल शेतातून सुरू असलेली वहीवाट बंद करणे कडे आहे.त्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वहिवाट रस्ते, ग्रामीण रस्ते,हद्दीचे ग्रामीण रस्ते खुले करणे करिता मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत.

आणि ज्या अर्थी सदर प्रकरणांमध्ये स्थळ निरीक्षण करणे,मोजणी करणे तसेच सुनावणी घेणे बंधनकारक आहे व त्यामुळे सदर रस्ते खुले करण्यासाठी काही कालावधीची आवश्यकता आहे यासंदर्भातील परिस्थितीचा विचार करता शेतकरी वर्गाच्या रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामीण रस्त्यावरील अतिक्रमण काढणे करिता शासनाने काढलेल्या उक्त संदर्भ क्र.१ येथील शासन परिपत्रकामध्ये दर्शवलेले ग्रामीण भागातील गाडी मार्ग (पोटखराब) हे राज्यात भूमापनाचे काम पूर्ण करीत असताना सदर रस्त्यांचा तपशील व रुंदी १६.५ ते २१ फुटापर्यंत निश्चित केलेली असून त्याचा तपशील सदर भूमापन क्रमांकाच्या पोट खराब क्षेत्राचा विचार करताना प्रतिबुकात नमूद केलेला आहे आणि ज्या अर्थी पायमार्ग हे गावाच्या नकाशात तुटक रेषेने दर्शवलेले असून अशा पाय मार्गाची रुंदी ८.२५ फूट असलेले निश्चित आहे अशा पद्धतीचे विशेष कालावधीत तारखेनुसार टप्पे तयार करत विशेष मोहीम हाती घेत तालुका प्रशासनाला विहीत मुदतीत अहवाल सादर करण्याच्या सूचना देन्यात आल्या.

दि.१६ डिसेंबरला पेरू वाटप आंदोलन होताच १८ डिसेंबरला शिवपानंद शेतरस्ते खुले करण्याचे परिपत्रक काढून सन्माननीय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शेतकऱ्यांची मने जिंकल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील,प्रकाश होनराव,ज्ञानेश्वर काकड, समाधान टिळे,डॉ.धीरज होले,दीपक शिंदे,ज्ञानेश्वर घोटेकर,भाऊ तासकर,दत्तात्रय घोटेकर, विलास दौंड,वाल्मीक गायकवाड, गोरख मालसाने,सचिन शेळके,भाऊसाहेब वाळुंज, संजय साबळे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले. “पेरू वाटप”आंदोलनाची दखल घेत दोनच दिवसात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीचे परिपत्रक

चौकट
नाशिक जिल्हा व तालुका प्रशासनाला जिल्हाधिकारी यांच्या कडून विशेष सूचना सर्व तालुक्यामधील गटविकास अधिकारी यांचे मार्फत ग्रामपंचायत यांना आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे,पोलीस निरीक्षक यांना उपरोक्त नमूद केले बाबत निशुल्क पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणे,उपअधिक्षक भूमीअभिलेख यांना सादर कामे जुने नकाशे त्वरित उपलब्ध करून देणे बाबत सुचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23 ° C
23 °
23 °
82 %
7.1kmh
93 %
Mon
28 °
Tue
25 °
Wed
24 °
Thu
28 °
Fri
27 °
error: Content is protected !!