नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मनस्वी साखरेचे घवघवीत यश – राज्यात दुसरी

सर्व सहमतीने जागा ठरवून संविधान भवन बांधणार – पुरुषोत्तम लगड

कोळगाव येथे संविधान भवनसाठी सर्वानुमते निर्णय घेऊन संविधान भवन उभे करू तसेच सध्या कोळगाव मधील तयार होत असलेले रस्ते टेंडर नुसारच होतील अशी ग्वाही कोळगाव येथील विशेष ग्रामसभेत बोलताना लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी दिली.

श्रीगोंदा, ता. २७ : कोळगाव येथे दिनांक २५ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये अनेक विषय चर्चिले गेले. या विषयांना उत्तर देताना सभेचे अध्यक्ष तथा सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी लवकरच कोळगाव येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करणे, जल जीवन मिशन अंतर्गत वाडी व वस्त्यांसाठी संबंधित ठेकेदाराकडून पाणी योजनेची टेस्टिंग पूर्ण करून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे, संविधानासाठी लागणारी जागा मागासवर्गीय समाजातील जनतेला व सर्वांना विश्वासात घेऊन ठरवली जाईल व त्यावर संविधान भवन उभे करणे, कोळगाव मध्ये सध्या वीस कामांचे टेंडर नुसार कामे पूर्ण करून घेणे, गट नंबर ७२३ मधील जागेची मोजणी नोटीसा काढून करणे, शहीद कलगुंडे मेजर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करणे, मंगल कार्यालय व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतच्या मालकीचे असणारे वीरभवन ची दुरुस्ती करणे, कोळगाव ग्रामपंचायत मध्ये १८१ घरकुले मंजूर झाली असून यादीतील क्रमांकानुसार ती पूर्ण करणे अशी विविध कामे कोळगाव ग्रामपंचायत अंतर्गत मार्गी लावण्याचा विश्वास पुरुषोत्तम लगड यांनी दिला.

या ग्रामसभेमध्ये माजी सभापती प्रतापराव नलगे यांनी, कोळगाव साठी मंजूर झालेले संविधान भवन ग्रामपंचायत मालकीच्या जागेत व्हावे, शहीद कलगुंडे स्मारकासाठी जागा उपलब्ध करावी, गट नंबर ७२३ मोजणी पूर्ण करावी, ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागा घरकुलांसाठी उपलब्ध करावी, पाणी योजनेचे रखडलेले काम सुरू करावे, वाडी वस्त्यावर पाणी उपलब्ध करावे, महादेव मंदिरासमोरील रस्ता टेंडर नुसार पूर्ण करावा, ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या वार्डातील सुरू असलेल्या कामाबाबत दक्ष रहावे, वाघेरखेलवाडी रस्त्यावर पाचशे फूट वर टाकलेले सिमेंट पाईप २५० फुटावर टाकावेत. यापूर्वी गावात केलेले सिमेंट रस्ते तीन वर्षात कसे काय उखडले गेले याबाबत नाराजी व्यक्त केली. कोळगाव ग्रामपंचायत ने पारदर्शी कारभार करावा अशी अपेक्षा प्रतापराव नलगे यांनी केली.
शिवसेना शहर प्रमुख प्रवीण खेतमाळीस यांनी कोळगाव स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, सार्वजनिक पाणी योजनेचे पाणी रस्त्यावर आल्याने संबंधितांना नोटीसा द्याव्यात, तसेच कोळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर विविध कामांसाठी आलेले आहेत अशा मजुरांची कामगारांची नोंद ग्रामपंचायतीने ठेवावी, पोलीस स्टेशनची रात्रीची गस्त चालू ठेवावी अशा समस्या ग्रामसभेत मांडल्या. ग्रामपंचायत सदस्य निलेश काळे यांनी कोळगाव मध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय व अभ्यासिका सुरू करावे, मोहरवाडी रस्ता पूर्ण करावा अशी सूचना मांडली.

ग्रामसेवक शरद कवडे यांनी २६ जानेवारी च्या आत गट नंबर ७२३ ची मोजणी पूर्ण करणे, वाडीवस्त्यावर पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे, घरकुल जागेबाबत लाईन आऊट करणे, शहीद कलमुंडे यांच्या स्मारकांसाठी जागा उपलब्ध करून मोजणी करणे, विविध विभागांची चालू असलेली कामे इस्टिमेट ग्रामपंचायत कडे उपलब्ध करून घेणे, परप्रांतीय कामगारांची नोंद मालकांनी ग्रामपंचायतीकडे करण्याचे आवाहन केले.

या ग्रामसभेत विद्यमान उपसरपंच माया मेहेत्रे यांनी दिलेला राजीनामा मंजुरीसाठी पाठवण्याचा ठराव करण्यात आला. तसेच कोळगाव मधील अमोल जगताप, अविनाश जगताप ,प्रदीप लगड व अमोल राऊत यांची भारतीय सेना दलात निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या ग्रामसभेत सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच माया मेहेत्रे, ग्रामपंचायत सदस्य विलास शितोळे, नंदू लगड ,महेंद्र रणसिंग, स्वप्नील धस, निलेश काळे, चिमणराव बाराहाते, निखिल लगड ,संजय जगताप, वैजयंता लगड, प्रतिभा धस, संतोष मेहत्रे, शिवसेना शहराध्यक्ष प्रवीण खेतमाळीस, तंटामुक्ती अध्यक्ष गोटू लगड, माजी उपसरपंच नितीन नलगे ,मेजर कलगुंडे, ग्रामसेवक शरद कवडे तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.6 ° C
23.6 °
23.6 °
83 %
6.2kmh
100 %
Sun
24 °
Mon
27 °
Tue
24 °
Wed
23 °
Thu
31 °
error: Content is protected !!
WhatsApp Group