जिल्हाधिकाऱ्यांच्या महाराजस्व अभियानाची तालुका प्रशासकडून पायमल्ली
शेत तिथे दर्जेदार शेतरस्त्यासाठी पुन्हा जिल्ह्यात पारदर्शक महाराजस्व अभियान राबवा – शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटिल (महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ)
अहिल्यानगर, ता. ३ : विभाजनानंतर शेतजमिनींची होत चाललेली तुकडेवारी यामुळे शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असुन अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ते खुले करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून प्रशासणाचे लक्ष वेधण्यासाठी पेरू वाटप आंदोलन करण्यात आले यावेळी सन्माननीय जिल्हधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी विशेष मोहीम हाती घेवून जिल्ह्यात महाराजस्व अभियानाचे परिपत्रक काढून कालबद्ध कार्यक्रम राबवण्याच्या सुचना तहसिल कार्यालयांना दिल्या परंतू तहसिल कार्यालयांकडून या अभियानाला केराची टोपली दाखवण्यात आली
त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतरस्त्यांचा प्रश्न जैसे थे राहीला आहे या महाराजस्व अभियानाची दखल घेत इतर जिल्ह्यांमध्ये तहसिल कार्यालयांकडून यशस्वी उपक्रम पार पडत आहे परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा,नेवासा आदी तालुके सोडता कुठेही यावर प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आलेली नाही महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन चालु असताना श्रीगोंदा तहसिल कार्यालयाकडून विशेष सहकार्य लाभत आहे या तालुक्याला मॉडेल म्हणून घोषीत करण्यासाठी जिल्हा प्रशासणाणे विशेष कृती आराखडा तयार करावा, तहसिलवर शुन्य रस्ता केसेस ठेवाव्यात, भूमिअभिलेख कार्यालयामधे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा भरून काढणे, उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे पारनेर तालुक्यातील दाखल निकालानुसार ६० दिवसांच्या आत शेतरस्ते खुले करून द्यावेत, शिव पानंद शेतरस्ते खुले करताना शासकीय कामात अडथळा आणल्या कारणाने संबंधितांवर तातडीने फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून दंड आकारण्यात यावा.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुकयातील शिव पाणंद शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी चळवळीच्या वतीने दिले असुन वरिल मागण्या मान्य न झाल्यास दि. १७/०२/२०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा ईशारा प्रशासणास दिला आहे.
चौकट
अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा नव्याने महाराजस्व अभियान राबवावे,तहसिल कार्यालयांकडून शेतकऱ्यांची होणारी विवंचना,शेतरस्ता केसेस सुनावणीतील दिरंगाई,शेतरस्त्यांअभावी पडीक राहणाऱ्या भुधारकांना विनाअट नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर तहसिल कार्यालयात शेतरस्ता केसेसमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर तालुका प्रशासणाची बैठक लावावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या शरद पवळे/दादासाहेब जंगले पाटील यांनी जिल्हाधिकार्यालयावर महामोर्चाचा ईशारा दिला आहे.