कै.शांतीलाल दत्तात्रय मांडगे यांचा दशक्रिया विधी दि. ४ रोजी सिद्धटेक, भीमा नदीतीरी होणार आहे
कर्जत, ता. ३ : दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी रेहकुरी येथील शांतीलाल दत्तात्रय मांडगे हे दुचाकी वरून कुळधरण कडून कर्जतच्या दिशेने जात असताना त्यांच्या दुचाकीस दुपारी चारच्या सुमारास समोरून येणाऱ्या स्विफ्ट गाडीने जोराची धडक दिली व तेथेच ते गाडीवरून खाली पडले व त्यांच्या डोक्याला तसेच डाव्या पायाला व बरगडीला खूप प्रमाणात मार लागला त्यानंतर त्यांना उपचारासाठी कर्जत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्यांना बारामती येथे उपचारासाठी नेले परंतु तेथून पुन्हा त्यांना पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यावेळेस उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मांडगे यांनी जगदंबा सहकारी साखर कारखाना येथून १९७८ साली नोकरीस सुरवात केली त्यानंतर त्यांनी कडा सहकारी साखर कारखाना,आदिनाथ सहकारी साखर कारखाना, इंदापूर सहकारी साखर कारखाना या कारखान्यात चांगल्या पदावर काम केले २०१५ साली सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथून पॅन इन्चार्ज या पदावर काम करत असताना ते सेवानिवृत्त झाले.
रेहकुरी गावात ते राजकीय,सामाजिक, धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेत होते गावातील यात्रा कमिटीचे अध्यक्ष पद बरेच वर्षे त्यांनी भूषवले. रेहकुरी ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये त्यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले व त्यांचा पॅनलचा बहुमताने विजय झाल्या नंतर बहुमताने त्यांच्या पत्नीला उपसरपंच केले. घोडेगाव सेवा सोसायटीचे चेअरमन गंगाराम मचे यांचे ते दाजी होते. शांतीलाल दत्तात्रय मांडगे यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे त्यांचे चार भाऊ, तीन बहिणी,पत्नी,दोन मुले,दोन सूना, चार नातवंडे, नातेवाईक असा मोठा परिवार आहे.