टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१७ सप्टेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील कोळेकर बाळू यांची शेळी बिबट्याने आज दुपारी १२:३० वाजता मारली आहे . दिवसा ढवळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समोर होणारे पशुधनाचे नुकसान शेतकरी उघडया डोळ्यासमोर सहन करत आहे.
कुठल्याही प्रकारची सरकारी यंत्रणा कार्यरत नाही. वनविभागाच्या सरकारी अधिकाऱ्यांना फोन केले तर ते फोन उचलत नाहीत अशी माहिती यावेळी शेडगाव-पेडगाव शिवारातील श्रीगोंदा तालुक्याचे समता परिषद कार्यकर्ते व शेतकरी शंकरआबा भुजबळ यांनी टीम लोकक्रांतीच्या प्रतिनिधींन सोबत बोलताना सांगितली. त्याचबरोबर आम्हाला तात्काळ मदत मिळावी अन्यथा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन सरकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
- शेडगाव, पेडगाव, अधोरेवाडी, वेळू, टाकळी कडेवळीत, कोकणगाव, आढळगाव, चांडगाव, घोडेगाव,भिंगान या गावांच्या पट्ट्यात बिबट्याचे रोज दर्शन होत आहे. तरी या भागातील पाळीव प्राण्यांबरोबरच शेतकऱ्याच्या जीविताला धोका आहे.
रोज एकक शेतकर्याला एका प्राणीमात्राला मुकावे लागत आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकरी आधीच मेटा कुटीला आला आहे त्यातच शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पशुधनाला नुकसान पोहचत आहे. एकीकडे पाळीव प्राण्यांना लम्पि आजाराचा धोका असताना आता हे नवीनच संकट समोर उभे राहिले आहे. बिबट्यांची संख्या एक नसून जास्त असण्याची संभावना आहे. ते शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. शेतकरी वर्ग विनंती करत आहे बिबट्या चा लवकरात लवकर बंदोबस्त करावा.
स्त्रोत:(पीडित शेतकरी)