महादजी शिंदे विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी स्त्री मुक्ती दिन साजरा
श्रीगोंदा, ता. ३ : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात सावित्रीमाई फुले यांचे जीवन महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना सुधीर साबळे यांनी सावित्रीबाईंचे जीवन हे समग्र स्त्रियांच्या जीवनात अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे, गुलामीतून स्वातंत्र्याकडे घेऊन जाणारी एक पहाट होती, असे प्रतिपादन केले.
यावेळी सुरेश गायकवाड, अध्यक्षीय मनोगत प्राचार्य दिलीप भुजबळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मंचावर विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे, गुरुकुल प्रमुख विलास लबडे, ज्येष्ठ शिक्षक विलास दरेकर, कलाशिक्षक संतोष शिंदे, अभिमान सोनवणे, अंकुश हिंगणे, भगवान मुखेकर, प्रदिप पाडळे, प्रविण तिटकरे, दत्तात्रय मोरे, सुरेश टकले, भारती कदम, संजीवनी झिटे, माधुरी सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी प्रेमकुमार गदादे, सूत्रसंचालन अथर्व वागस्कर तर आभार प्रदर्शन श्रवण येरकळ यांनी केले.