विसापूर गावच्या रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी रस्सिखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे
श्रीगोंदा, ता ७ : विसापूर येथिल पाचपुते गटाच्या सायली गटणे ह्या दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी उपसरपंच पदी बिनविरोध निवडून आल्या होत्या त्यांचा ठरल्या प्रमाणे कालावधी पुर्ण झाल्यामुळे उपसरपंच पदाचा दिनांक ०७ जानेवारी २०२५ रोजी राजिनामा दिला.
सायली गटणे यांनी उपसरपंच कार्यकाळात तत्कालीन आमदार मा.मंत्री बबनराव पाचपुते यांचेकडून विसापूरगावच्या विकास कामांकरिता अनेक प्रकारचा निधी आणला त्यामध्ये जगदंबा देवी देवस्थान मंदिर कंपाउंड करिता दहा लाख निधी,बुध्द विहार करिता दहा लाख निधी,नवनाथ मंदिर कंपाउंड करिता दहा लाख निधी तसेच जिल्हा परिषद सदस्य दिनुकाका पंधरकर यांचे मार्फत विसापूर जिल्हा परिषद शाळा खोल्या करिता पाठपुरावा करुन मा.खा.सुजय विखे पा.यांचेकडून वर्ग खोल्यांचे काम मागवून ते काम पुर्णत्वाकडे आहे.
तसेच विसापूर मध्ये वार्ड क्र.३मधिल अनेक दिवसांचा रखडलेला गटार योजना,वसाहत अंतर्गत पेव्हींग ब्लाॅकची कामं ,वार्ड क्र.३ मध्ये पथदीव्यांची कामं मार्गी लावली असून विसापूरगावच्या स्मशान भुमी व कब्रस्थानच्या जागेसाठी सुध्दा त्यांचा आमदार विक्रम पाचपुते यांचे मार्फत जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडे पत्रव्यवहार सुरु असून लवकरच तो सुध्दा प्रश्न निकाली निघेल.
यापुढेही विसापूरच्या विकासासाठी त्या कामं करितच राहतील असं सौ.गटणे या म्हणाल्या. रिक्त झालेल्या उपसरपंच पदावरून सध्या उपसरपंच पदासाठी रस्सिखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे