श्रीगोंदा पोलीसांची मोटर सायकल चोरावर कारवाई; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, १० चोरीचे गुन्हे उघडकीस..!

श्रीगोंदा न्यायालय आणि परीसरातुन होणाऱ्या मोटर सायकल चोऱ्यांचा पोलीसांनी लावला छडा

श्रीगोंदा, ता. ९ : श्रीगोंदा पोलीसांची मोटर सायकल चोरावर मोठी कारवाई १० लाखांचा मुद्देमाल जप्त, १० चोरीचे गुन्हे उघडकीस झाले असून श्रीगोंदा न्यायालय आणि परीसरातुन होणाऱ्या मोटर सायकल चोऱ्यांचा श्रीगोंदा पोलीसांनी छडा लावला, दि. ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा. चे सुमारास श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली कि, श्रीगोंदा पो स्टे हद्दीतील काष्टी गावामध्ये एक इसम संशयीत रित्या विना नंबर प्लेटच्या मोटर सायकलवर फिरत आहे. अशी गोपनीय माहिती मिळाली.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पोना/२९५ गोकुळ इंगावले, पोकॉ/३१४ संदिप शिरसाठ,पोकॉ/२५६५ संदिप राऊत व पोकॉ/२७० अरुण पवार असे पेट्रोलिंग करीता काष्टी गावात रवाना केले असता,पेट्रोलिंग दरम्यान श्रीगोंदा चौक, काष्टी येथे एक इसम श्रीगोंदा चौकात मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी संशयीतरीत्या मोटार सायकलवर फिरत असताना मिळून आला असता त्यास त्याचे नाव-गांव विचारले असता त्याने त्याचे नाव महेंद्र बाळु सुपेकर रा. पुनर्वसन काष्टी ता.श्रीगोंदा येथे राहत असल्याचे सांगीतले. त्याचेकडे विनानंबरची मोटार सायकल असल्याने त्याचेकडे गाडीचे नंबरप्लेट व कागदपत्राबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यावेळी त्याचा संशय आल्याने त्यास चौकशी कामी ताब्यात घेवून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणून त्याचेकडे अधिक चौकशी केली त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान आरोपीस विश्वासात घेवून त्याचेकडे
मोटार सायकल चोरी विषयी अधिक चौकशी केली असता त्याने सांगीतले की, मला पैशांची आवश्यकता असल्याने मी कोर्टाचे पार्किंग, श्रीगोंदा शहर,काष्टी गावात व इतर वेगवेगळया ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी केल्या असल्याबाबत सांगितले. त्याचेकडे चोरलेल्या मोटार सायकल बाबत कसुन चौकशी केली असता, चोरीच्या मोटार सायकल काही दिवस वापरुन त्या मी माझे मित्रांना तसेच ओळखीचे लोकांना खोटे सांगीतले की, मी माझ्या मित्राची मोटार सायकल त्यास पैशांची गरज असल्याने त्यास मोटार सायकल विकायची आहे, मोटार सायकलचे कागदपत्रे नंतर देतो, असे खोटे सांगून मोटार सायकल दिलेल्या आहे व काही मोटार सायकल माझ्या घराचे जवळील शेतात लपवून ठेवल्या आहेत, असे सांगीतल्याने पोलीस पथकाने जावून सदरच्या चोरीच्या मोटार सायकल पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या.

सदर वेगवेगळया ठिकाणाहुन चोरी केलेल्या एकुण १० मोटार सायकल असा एकुण दहा लाख रुपये किमंतीचा मुददेमाल हस्तगत केला असून आरोपी जेरबंद आहे. सदर मोटार सायकलच्या मालकाचा शोध घेण्याचे काम चालु असून वरील मोटार सायकल ज्याचे असतील त्याने श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कारवाई ही राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे सो, अपर पोलीस अधिक्षक, व विवेकानंद वाखारे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग तसेच पोलीस निरीक्षक किरण शिंदे सो, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांचे पथकामधील पो.ना/गोकुळ इंगावले, पोकॉ/ संदिप राऊत, पोकॉ/संदिप शिरसाठ, पोकॉ/अरुण पवार व कोर्ट ऑर्डली मपोकों/रुपाली मोटे यांचे विशेष मदतीने व सदर गुन्हयाचे तपासात दक्षिण मोबाईल सेल नेमणुकीचे पोकों// राहुल गुंडु व पोकों/नितीन शिंदे यांची मदत मिळाली असून सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेकॉ आप्पासाहेब तरटे व पोकॉ/ प्रविण गारुडकर हे करीत आहेत.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
34.8 ° C
34.8 °
34.8 °
18 %
4.6kmh
4 %
Fri
36 °
Sat
38 °
Sun
39 °
Mon
40 °
Tue
40 °
error: Content is protected !!