श्रीगोंदा, दि. १८ : तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या कायम अग्रस्थानी राहिलेल्या “वांगदरी सोसायटीच्या ” चेअरमन पदी” राजेंद्र निळकंठ नागवडे यांची वर्णी लागली आहे माजी चेअरमन विजय नागवडे यांनी महिन्यापूर्वी राजीनामा दिल्या नंतर रिक्त झालेल्या जागेची निवडून प्रक्रिया १५ जानेवारी २०२५ रोजी ११:०० वा.पार पडली. राजेंद्र निळकंठ नागवडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून बी.बी सिनारे व सचिव आर.पी.अडागळे यांनी काम पाहिले.
निवडी बद्दल “नागवडे” कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, अ.नगर जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.अनुराधा ताई नागवडे, श्रीगोंदा खरेदी विक्री चे मा.संचालक साहेबराव महारनूर, सरपंच संजय नागवडे, ग्रा.सदस्य महेश नागवडे, श्रीगोंदा खरेदी विक्री चे संचालक आदेश नागवडे, व्हा.चेअरमन सर्जेराव मासाळ, अंबिका पाणी वापर संस्थेचे चेअरमन महादेव सोनवणे, मा.चेअरमन विजय नागवडे, मा.व्हा.भाऊसाहेब हंडाळ, सुभाष गोरे, बापूराव चोरमले, आबासाहेब मदने, हेमंत नागवडे, रामचंद्र गवळी, तुषार नागवडे, अशोक बारवकर, पांडुरंग जाधव, सुधाकर वांगणे, गोकुळ फराटे, उमेश नागवडे, नारायण सुपेकर, प्रमोद नागवडे, संचालक मंडळ, ग्रा.पं सदस्य यांनी अभिनंदन केले.