श्रीगोंदा, ता. १८ : तालुक्यातील मढेवडगांव येथील सामाजिक कार्यकर्ते स्मितलभैया वाबळे यांच्या प्रयत्नातून न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगांव येथील आर्थिक दृष्ट्या गरीब १२मुलींना अहमदनगर जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग मार्फत २०%सेस निधीतून सायकल प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी वाबळे यांनी सांगितले की सामाजिक कार्यकर्ता हा पदातून मुक्त झाला तरी, कर्तव्यातून मुक्त होत नसतो.सध्या कोणत्याही पदावर नसलो तरी सामाजिक कार्याची जाणीव ठेवून मी कायम कार्यरत राहणार या साठी मला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ राणी फराटे, विस्तार अधिकारी सौ.हराळ व वरिष्ठ सहाय्यक नागेश लोखंडे आदींचे सहकार्य लाभले.
लाभार्थी विद्यार्थिनी ऋतुजा चंद्रकांत शेंडगे, तेजू सुनील विठेकर, कल्याणी कैलास गायकवाड, दूर्वा जनार्दन आढागळे, दुर्गा अमोल उदमले, तृप्ती सुधीर चव्हाण, संजना अमोल ठोकळे, अंजली भरत घोडके, अनुष्का अनिल उबाळे, अस्मिता महादेव साळवे, नीता कुमार गिरी, राधा विष्णू ठोकळे आदींना सायकल वाटप करण्यात आले.
मढेवडगांवचे सरपंच प्रमोद शिंदे, नागवडे कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, जन सेवक स्मितल वाबळे,मुख्याध्यापक दांगडे सर, ग्रामसेवक खाडे भाऊसाहेब, चेअरमन प्रकाशराव उंडे, वर्षा वाबळे ,नलिनी गाढवे, उषाताई मांडे, रविंद्र महाडिक,नंदिनी वाबळे, नयनतारा शिंदे, कल्पना वाबळे,शंकरअण्णा मांडे, दत्तात्रय गोरे, वसंतराव उंडे, विठ्ठलराव वाबळे, काकासाहेब मांडे, पत्रकार विजय उंडे, प्रशांत शिंदे, राहुल साळवे, उपसरपंच राजकुमार उंडे, योगेश शिंदे, बाबासाहेब फापाळे, सोमनाथ फरकांडे, सचिन उंडे, अभय गुंड, नवनाथ उंडे, विजय मांडे, प्रा.योगेश मांडे, संजय भोसले, नवनाथ वाबळे,भानुदास वाबळे,अभिजीत शिंदे आदी उपस्थित होते.