श्रीगोंदा, ता. २० : नवी दिशा, नवे उपक्रम या राज्यस्तरीय शैक्षणिक समूहाच्या वतीने दि. १९ जानेवारी २०२५ रोजी अहिल्यानगर येथे नवी दिशा, नवे उपक्रम भाग -३ पुस्तक प्रकाशन सोहळा व महाराष्ट्रातील गुणवंत शिक्षकांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार -२०२५ वितरण सोहळा संपन्न झाला. यामध्ये उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याची समूहातर्फे दखल घेऊन भुजबळ दिगंबर गोरख यांना उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.
यावर्षी महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांना एकत्रित करून त्यांनी प्रत्यक्ष वर्गात राबविलेल्या उपक्रमांचे पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण प्रसिद्ध रानकवी तुकाराम धांडे (‘ रानवेडी ‘कवितेचे कवी) , प्रसिद्ध लेखिका अंजलीताई अत्रे ( ‘ मिठाचा शोध ‘ या पाठाच्या लेखिका) , समूह प्रशासक देवराव चव्हाण सर व समूह प्रमुख, बळीराम जाधव सर यांच्या उपस्थितीत राज्यातील ३० उपक्रमशील शिक्षकांना ‘ राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक ‘ पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यामध्ये उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याची समूहातर्फे दखल घेऊन भुजबळ दिगंबर गोरख शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडगाव जुने तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर व रोहिदास दळवी सर शाळा-जि.प.प्रा शाळा हंगाक्लास तालुका श्रीगोंदा यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
याप्रसंगी सौ.उषा भुजबळ उपाध्यक्षा, शिवदुर्ग संवर्धन समिती.महाराष्ट्र राज्य,कु.अपूर्वा भुजबळ, लक्ष्मण शेंडे सर व श्रीमती सुरेखा शिंदे मॅडम उपस्थित होते.