महादजी शिंदे विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध स्पर्धा व कथाकथन स्पर्धांचे आयोजन
श्रीगोंदा, ता. २५ : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात मा. जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर (निवडणूक शाखा) यांच्या आदेशाने सहा. मतदार नोंदणी अधिकारी श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ तथा तहसिलदार श्रीगोंदा यांचे कार्यालय, श्रीगोंदा आणि गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनाचे अनुषंगाने निबंध व कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
त्याअनुषंगाने १८ वर्ष पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश
करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा मुख्य उद्देश आहे.
अ) पहिला गट इयत्ता ५ वी ते ८ वी निबंधाचा विषय
१) माझे मत माझे भविष्य
२) लोकशाहीतील मताधिकाराचे महत्त्व
३) भारतातील लोकशाही
ब) दुसरा गट इयत्ता ९ वी ते १२ वी निबंधाचा विषय
१) मी मतदार नव्या युगाचा
२) जागृत मतदाराचे लोकशाहीतील महत्त्व
३) मताधिकार सर्वश्रेष्ठ अधिकार
या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आली.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा निकाल
लहान गट – इयत्ता ५ वी ते ८ वी
प्रथम- जामदार पृथ्वीराज सागर
द्वितीय – कापसे आदिनाथ गजानन, तृतीय – खामकर अजिंक्य शरद
मोठा गट – (इयत्ता ९वी ते १२वी)
प्रथम – पोटे पायल महादेव
द्वितीय – वाडेकर साक्षी मारुती
तृतीय – व्यवहारे ओम तुळशीराम
कथाकथन स्पर्धा निकाल
लहान गट
प्रथम कार्तिकेय संदीप खेतमाळीस
द्वितीय श्रवण शहाराम येरकळ
तृतीय विक्रांत सतीश दरेकर
मोठा गट
प्रथम धोंडे निशांत नवनाथ
द्वितीय वैष्णवी जगताप
तृतीय वाडेकर साक्षी
वक्तृत्व निबंध स्पर्धेसाठी मंजुश्री चोथे तर कथाकथन स्पर्धेसाठी ग्रंथपाल धनंजय देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
या विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य दिलीप भुजबळ, पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे, सुधीर साबळे, विलास लबडे, विलास दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.