ऊस तोड वहातुक करणाऱ्या मजूरांनी आपली भावी पिढी सज्ञान, सक्षम व सदृढ घडविणेसाठी बालकांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीय मुजीब शेख यांनी केले.
श्रीगोंदा, ता. २५ : श्रीगोंदा तालुका विधी समिती, वकिल संघ व सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २२ रोजी कारखाना कार्यस्थळावर ऊस तोड मजूर महिलांकरीता हळदी कुंकू व साडी वाटप करुन त्यांचा सन्मान करणेत आला. सदर प्रसंगी अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
शेख पुढे म्हणाले की, ऊस तोड मजूरांचे जीवन हे अतिशय खडतर असते. महिला भगीनींना स्वतच्या अरोग्याकडे, मुला-बाळांकडे लक्ष देण्यासाठी फार कमी वेळ मिळतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची व मुला बाळांची आबाळ होते. त्याचे दुष्परिणाम म्हणुन शाररीक व्याधी निर्माण होतात. मुलांना योग्य शिक्षण व संस्कार न मिळाल्यामुळे त्यांची दिशा भरकटते व ते चुकीचे मार्गाने जातात. याकरीता महिलांनी आपल्या कुटुंबाबरोबर आरोग्य व मुला-मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देवून त्यांना चांगले संस्कार देण्यासाठी सावध असावे असे ते म्हणाले
वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीय सी.व्ही. शिरसाठ मॅडम यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करत असताना कौटुंबिक, शाररीक व मानसिक हिंचाराची सविस्तर माहिती देवून त्यातून बाहेर पडण्याबाबत जर मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, ऊस तोड मजूर महिला घरदार सोडून दूर अंतरावर येत असतात. त्यांना सणावाराला कुटुंबाचा स्नेह मिळत नाही. तो मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीमध्ये ऊस मजूरांचे योगदान हे लाख मोलाचे आहे. त्यांना पाच ते सहा महिने स्वतःचे गांव व घर सोडून बाहेर जावे लागते. त्यामुळे कुटुंबियांचा दूरावा दूर करुन त्यांना मायेचा ओलावा मिळावा याकरीता विधी समितीने पुढाकार घेवून आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय स्तुत्य व प्रेरणादायी आहे.
सदर कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी.पी. शिंगाडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस.पी. केकान, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एच.जे.पठाण, वकिल संघाचे अध्यक्ष अॅङ अशोकराव वाळुंज, अॅङ विश्वास नागवडे, अॅङ झुंबरराव गायकवाड, वांगदरी सोसायटीचे चेअरमन राजेंद्रं नागवडे तसेच श्रीगोंदा बार असोसिएशनचे सदस्य, कारखान्याचे अधिकारी, कामगार व ऊस तोड मजूर, मुकादम महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सुमारे ३०० महिला भगीनींना मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप करणेत आला.
अॅङ जयंत शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. प्रास्ताविक अॅङ सुनिल भोस यांनी केले तर आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रविण शिंदे यांनी मानले.