वधूवर सूचक मंडळ व बौध्द संस्कार संघ आयोजित भव्य बौध्द धम्मीय वधूवर मेळावा

श्रीगोंदा, ता. ३० : मंगल परिणय वधूवर सूचक मंडळ व बौध्द संस्कार संघ आयोजित भव्य बौध्द धम्मीय वधूवर मेळावा रविवार २ फेब्रुवारी २०२५ रोजी स. ११ ते दु. ४.३० वा. श्रीगोंदा तालुकातील ११५ गावामधील जे बौध्द धम्मीय लोक नोकरी निमित्त मोठ्या शहरात स्थायीक झाले आहेत .ज्यांची मुले व मुली १० वी, १२ वी, पदवीधर पर्यंत शिकलेले मुले, शेतकरी, व्यावसायीक नोकरी करणार्‍या मुलामुलींना ग्रामीण भागातील मुले मुली मिळाव्यात तसेच ग्रामीण भागातील मुलामुलींना उच्च पदस्थ स्थळे मिळवित अशा बौध्द बांधवांना एकत्र आणून त्यांचेच नातेवाईकांतून धागादोरा लागून अपेक्षीत मुलामुलींचे विवाह जुळून यावेत या उद्देशाने मंगलपरिणय सूचक मंडळाने भव्य वधूवर मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या मेळाव्यात असंख्य मुले-मुली एकाच स्टेजवर येणार असल्याने एकाचवेळी निवड करण्याचे फायद्याचे ठरणार आहे. तरी अधिकाधिक बांधवांनी उपस्थित राहून या मेळाव्याच लाभ घ्यावा या मंडळाच्या मेळाव्याचे हे २२ वे वर्ष आहे . सकाळी ११ ते दुपारी १.३० वा. नाव नोंदणी व नाष्टा दुपारी १.३० ते २ मंडळ व्यवस्थापन-मान्यवर, स्वागत, मनोगत दुपारी २ ते ३.१५ इच्छूक वधूवर परिचय नाव नोंदणी फॉर्म वाचन दुपारी ३.१५ ते ४.३० वधूवर पसंती, मागणी, मिटिंग, बैठक, चर्चा मुलामुलींची माहिती लिहून घेण्यासाठी पेन व कोरा पेपर देण्यात येईल. मेळाव्याचे ठिकाण तुळशीदास मंगल कार्यालय पेडगाव रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर आहे नवीन सभासदांसाठी नाव नोंदणी रु. ५००/- असणार आहे मेळाव्यात प्रवेश पास प्रत्येकी फक्त रु १००/- या मेळाव्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी, बुकिंग सुरु असून ऑनलाईन पास साठी भाऊसाहेब देठे मो. – ९८८१५३११८८ संपर्क करावा .

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!