श्रीगोंदा, ता. ३० : इंटर इंजीनिअरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन विभागीय स्पर्धा मध्ये फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्निक अकोले. येथे २७ जानेवारी रोजी झालेल्या कबड्डी, खो-खो स्पर्धेमध्ये कबड्डी खेळामध्ये अंतिम सामन्यांमध्ये परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टी.विरुद्ध अशोक पॉलीटेक्निक श्रीरामपूर.असा सामना रंगला.
अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये २०-२० गुणांनी सामना टाय झाला. व दोन्ही संघांना पाच पाच रेड देण्यात आले यामध्ये परिक्रमा तंत्रनिकेतन संघ विजयी झाला. तसेच कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या खेळाडूंचे परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक, माजी नामदार बबनराव पाचपुते, अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव आमदार श्री.विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. प्रतापसिंह पाचपुते, अॅकॅडमी डायरेक्टर सौ.इंद्रायणी पाचपुते, मुख्य अति. कार्यकारी अधिकारी प्रा. अनिल पुंड, अती.अॅकॅडमी डायरेक्टर संजिवजी कदमपाटील, तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी, , इंजीनिअरिंग प्राचार्य मोहन धगाटे, एम.बी.ए. डायरेक्टर डॉ. सुदर्शन गिरमकर, बी.फार्मसी प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ डी.फार्मसी प्राचार्य रमेश शिंदे, सायन्स कॉलेज प्राचार्य डॉक्टर पांडुरंग इथापे यांनी अभिनंदन केले. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना परिक्रमा तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.प्रशांत सूर्यवंशी सर व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अशोक राहिंज यांचे मार्गदर्शन लाभले.