नजरेआड गेलेला ऐतिहासिक वारसा शोधण्याचे महत्त्वपूर्ण काम शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन करत आहे; शिवदुर्ग च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेकांचा गुणगौरव!!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१९ सप्टेंबर २०२२ : सह्याद्रीचे दुर्गम दुर्लक्षित गडकिल्ले, संवर्धन, ऐतिहासिक वारसा जतन, महाराष्ट्र बारव मोहिम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या, शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १८/०९/२०२२रोजी संत ज्ञानेश्वर माऊली मंदीर कोळगाव येथे पार पडली! सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश इंगळे होते. उपस्थित सदस्यांचा सन्मान जिल्हाप्रमुख गणेश कुदांडे,तालुका प्रमुख अक्षय गायकवाड, संघटक अभिजीत आढाव, रहिम हवालदार, मेजर नवनाथ खामकर, प्रशांत शिंदे, संचलिका सुप्रिया कुदांडे, संगीता इंगळे यांनी केला.खजिनदार अजित दळवी यांनी प्रास्तविक केले.सचिव सोमेश शिंदे यांनी वर्षभरात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. व आर्थिक ताळेबंद मांडला.रणरागिणी वैशाली गायकवाड यांनी सदस्यांनी केलेल्या वैयक्तिक कार्याची माहिती दिली.मारुती साळवे यांनी इतिवृत्त लेखन केले.

शिवदुर्ग परिवाराचे कार्य पुढें नेण्यासाठी उपस्थित सदस्यांनी विविध विषयांवर सखोल चर्चा केली. अनेक ठराव संमत केले. सर्वच उपस्थितांचे बहुमोल विचार आणि मार्गदर्शन भविष्यकाळासाठी दिशादर्शक ठरणार आहे.या सभेत अनेकांनी आपले विचार मांडले.
शिवदुर्ग मावळ्यांचा यथोचित सन्मान-शिवदुर्ग सोबत ५० गडकोटांची ऐतिहासिक पदभ्रमंती पूर्ण केल्याबद्दल मारूती वागस्कर सर -५५ आविष्कार इंगळे -५४ जालिंदर सदाशिव पाडळे -५० निरज जालिंदर पाडळे -५० डॉ. अभय शिंदे -५० विठ्ठल ढाणे सर (सातारा) -५० यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.५२ किमी. पन्हाळा पावनखिंड राज्यस्तरीय ऐतिहासिक मोहिम यशस्वी पदभ्रमंती पुर्ण केल्याबद्दल १९ शिलेदार मावळ्यांचा सन्मान करण्यात आला.गडकोट पदभ्रमंतीमध्ये २५ पेक्षा जास्त किल्ले ट्रेक पूर्ण केल्याबद्दल २५ मावळ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.

बालवयात अवघ्या सातव्या वर्षी कळसुबाई शिखर सर करणारी, मोठी गरुडझेप घेणारी अदिरा गणेश कुदांडे हिला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.शिवाय प्रत्येक महिन्याला जेथे मोहिम असेल तेथील प्रत्येक गडावर संवर्धन कार्य करण्यासाठी यापुढे अधिक प्रयत्न केले जातील

  • शिल्लक वारसा आपण जतन करुया श्रीगोंदे तालुक्यात खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. इथे इतिहास घडला आहे. नजरेआड गेलेला हा वारसा आजही आपली वाट पाहत आहे. हा सर्व वारसा शिवदुर्ग संस्थेने शोधला आहे.सर्व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी शिवदुर्ग संस्था पुढील काळात प्रयत्न करणार आहे. यासाठी तरुणाईने साथ द्यावी. – शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष राजेश इंगळे

यावेळी अनेक सदस्य महिला रणरागिणी व बाल मावळे, उपस्थित होते. तुषार चौधरी, कविता खराडे, रूपाली आळेकर, संकेत लगड, नितीश गायकवाड, अभिजीत जठार नानासाहेब पवार, संदिप शेलार, अमोल बडे, संदीप शिंदे, ईश्वर कोठारे, शुभम लोकरे , प्रणव गलांडे आदींसह बाल मावळे उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचलन मारूती वागसकर यांनी केले.उपस्थित सर्वांचे आभार गोरख नलगे यांनी व्यक्त केले.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्रक)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.7 ° C
24.7 °
24.7 °
74 %
6.9kmh
100 %
Wed
29 °
Thu
26 °
Fri
25 °
Sat
23 °
Sun
25 °
error: Content is protected !!