खत आणि त्यावरील जबरदस्तीने दिले जाणारे खत; या विषयावर शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात..!

श्रीगोंदा, ता १ : शेतकऱ्यांनी खत खरेदी केल्यानंतर त्यावर जबरदस्तीने दिले जाणारे आणखी खत या विषयावर श्रीगोंदा कृषी अधिकारी यांना भेटून निवेदन दिले आहे आणि त्यांनी पण खत कंपन्या अशी मनमानी करू शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. जर हे बंद झाले नाही तर शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत अशी माहिती वांगदरी सेवा सोसायटी चेअरमन राजेंद्र नीळकंठ नागवडे यांनी दिली

खतांचा नियमित पुरवठा व अतिरिक्त खात्यांच्या लिंकिंग तक्रारी बाबत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड. वांगदरी स्थापना २८/०८/१९४१ स्वातंत्र्य पूर्व काळापासून कार्यरत असून ही संस्था स्वस्त धान्य दुकान आणि खत विभाग सक्षमपणे चालवत असून सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमच कटीबद्ध आहे. सदर
संस्थेत खत विभाग हा प्रत्यक्ष शेतकऱ्याशी जोडलेला विषय असून नियमित खत पुरवठा होण्यासंदर्भात कृषी विभागाशी संस्था म्हणुन वेळोवेळी संपर्क केला असुन आपल्या विभागकडून दखल घेण्यात आलेली नाही.

आपण याकडे लक्ष द्यावे शेतकऱ्यांना हवे ते खत मिळाले पाहिजे म्हणून संस्था कायम पाठपुरावा करत असते परंतु शासकीय विभागाशी संस्थेच्या बाबतीत कुठलाही पाठपुरावा होताना दिसत नाही शेतकरी हा अनेक संकटातून निसर्गाशी दोन हात करून शेती करण्याचा प्रयत्न करत असतो अनेक अडचणी व मात करून तो शेती करतो परंतु त्याला पाहिजे ते खत न मिळता कंपन्यांनी विनाकार लादलेली खत त्याला जबरदस्तीने देण्याचे काम खत कंपन्या करत असून याकडे कोणाचेही लक्ष नसून मोठ्या प्रमाणात सामान्य शेतकऱ्याची लूट चालू आहे सदर बाबतीत कृषी विभागाने प्रत्यक्ष लक्ष घालून तालुक्यातील सर्वच संस्थेला येणाऱ्या अडचणी आणि सभासदाच्या अडचणी याबाबत आपण सतर्क राहून शेतकऱ्यांच्या हिताचा आपण निर्णय घ्यावा अशी मागणी संस्थेचे चेअरमन तसेच सभासद शेतकऱ्यांनी केली आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
34.8 ° C
34.8 °
34.8 °
18 %
4.6kmh
4 %
Fri
36 °
Sat
38 °
Sun
39 °
Mon
40 °
Tue
40 °
error: Content is protected !!