अहिल्यानगर, ता. ३ : महान उद्योजक रतन टाटांनी मला एक लाख रुपयाने देऊन माझा दिल्लीत सत्कार केला होता त्यांच्याच जयंती निमित्ताने अग्नीपंखने सायकल वारी काढून मला जीवन गौरव पुरस्कार सन्मान केला यांचा मनस्वी आनंद आहे असे गौरवोद्गार जेष्ठ समाज सेवक राजाराम भापकर गुरुजी यांनी गुंडेगाव येथे बोलताना काढले
स्व रतन टाटा यांचे ८७ व्या जयंती निमित्ताने
रविवारी अग्नीपंख फौंडेशन ने दौड श्रीगोंदा मांडवगण गुंडेगाव कोरेगाव ही १३ वी प्रेरणा सायकल वारी काढली समाजसेविका रुपाली मुनोत लेखा अधिकारी रमेश कासार यांचे हस्ते राजाराम भापकर कृषीकन्या श्रध्दा पवार कृषी उद्योजक बाळासाहेब मोहारे व विजया लंके यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संतोष भापकर होते. सायकल वारीस वृध्देश्वरचे विठ्ठलराव वाडगे दिलीप काटे यांनी झेंडा दाखविला.
रुपाली मुनोत म्हणाल्या कि निस्वार्थ भावनेने समाजकार्य करणारे राजाराम भापकर यांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले अग्नीपंख फौंडेशनचा प्रेरणा सायकल वारी हा अतिशय चांगला उपक्रम आहे.
संजय पवार म्हणाले की श्रध्दा सारखी मुलगी प्रत्येकाच्या कुंटुबात असावी कोणतीही मुलगी हे आनंद आणि संस्काराचे प्रतिक आहे.
चौकट
आठवण आणि डोळ्यात पाणी
माझे बंधू स्व. शशीकांत याचे संकल्पनेतुन कोरेगावच्या माळरानावर कृषी पर्यटन केंद्र सुरु केले. आज नंदनवन झाले मात्र नंदनवन पाहण्यासाठी शशीकांत आज पाहिजे होता. असे भावनीक उद्गार बाळासाहेब मोहारे काढले यावेळी बाळासाहेब यांना अश्रू अनावर झाले
यावेळी रामदास झेंडे, संतोष भापकर, शहाजी खेतमाळीस, रमेश सांळुके, नवनाथ खामकर, गोपाळराव डांगे, लतिका वाबळे, रेखा डोंगरे, यांची भाषणे झाली प्रास्ताविक मिठू लंके सुत्रसंचलन नवनाथ दरेकर यांनी केले.
चौकट
सहभागी सायकल पटू
श्रीकर चोरमले, ओरोही डांगे,
अशोककुमार दुबे, दस्तगीर सय्यद, संकेत गांजुरे, लतिका वाबळे, मयूर डोंगरे, रेखा डोंगरे, तात्याबा डोंगरे, दिलीप वाबळे, वैभव जाधव, प्रशांत बंब, अनिकेत वाबळे, शहाजी खेतमाळीस, नवनाथ दरेकर, रमेश सांळुके,
प्रणित होलम,संतोष जाधव, प्रशांत एरंडे, नवनाथ खामकर, रेश्मा डांगे, गोपाळराव डांगे विजया लंके, संदीप जाधव, कैलास घाडगे, मिठू लंके, मनिषा काकडे.