श्रीगोंदा, ता. ४ : दिल्ली चिनी मंडी असोसिएशन ने चिनी मंडी फेस्टिव्हल २०२५ मध्ये पुणे येथील ओंकार शुगर ग्रुपला “सर्वात जलद साखर कारखान्यांचे अधिग्रहण” हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार अभिनेत्री हिना खान हिच्या हस्ते ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी स्विकारला आहे.
मांडवगण फराटा येथील कृषीपुत्र बाबुराव बोत्रेपाटील यांनी अतिशय जिद्दीने साखर उद्योगात प्रवेश केला अवघ्या पाच वर्षात राज्याच्या विभागात नऊ साखर कारखाने चालवत आहेत. साखर उद्योगातून ऊसाला चांगला भाव देण्याचे काम केले आहे त्यामुळे ओंकार शुगर ग्रुप साखर उद्योगाचा विस्तार झपाट्याने होत आहे साखर उद्योगातून ११ हजार ३०० कामगारांना रोजगार ६ लाख १३ हजार हजार शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप करुन त्यांच्या जीवनात क्रांती आणली आहे.
याची दखल घेऊ चिनीमंडी असोसिएशन ने ओंकार शुगर ग्रुपला सर्वात जलद साखर कारखाने अधिग्रहण पुरस्कार दिला आहे.