श्रीगोंदा, ता. ४ : शहरातील रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात रंगोत्सव तरुणाईचा जल्लोष एम.जे.एस.चा हा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी शुभेच्छा दिल्या ते म्हणाले शिस्तीचे पालन करून विविध गुणदर्शन या कार्यक्रमाचा आनंद घ्या विद्यार्थ्यांच्या कलेला दाद द्या तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुकही त्यांनी केले.
या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात भक्ती गीते, लोकगीते, चित्रपट गीते, प्रेरणादायी गीते इत्यादींचे गीत गायन उत्तम पद्धतीने विद्यार्थ्यांनी केले. शास्त्रीय नृत्य, कथक, लोकनृत्य, लावणी, बांगडा, समकालीन नृत्य, रिमिक्स गाण्यावरील डान्सला उदंड असा प्रतिसाद मिळाला. भरतनाट्यम, मावळा गीत या गीतांनाही विद्यार्थ्यांनी दाद दिली. फिशपोंड्सचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. त्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, सौ.लता जरे , सांस्कृतिक विभागाचे डॉ. राजाराम कानडे, कार्याध्यक्ष डॉ. बापू देवकर, प्रा. सौ. सुनिता सोनावळे, श्री रघुनाथ लबडे, डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, शा. शि. संचालक प्रा. कल्पना बागुल, प्रा. संजय डफळ, अधीक्षक बाळासाहेब राऊत, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी या उपक्रमासाठी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दिलावर पठाण, प्रा. प्रियांका म्हस्के यांनी केले. आभार प्रा. सौ सुनीता सोनावळे यांनी मानले.