श्रीगोंदा, ता. ४ : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा स्मृतिदिवस बाजार तळ महादेव मंदिर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे मेजर अंकुशराव ढवळे यांनी उमाजी नाईकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उमाजी नाईकांचा तसेच बहिर्जी नाईकांचा इतिहास बहुजनांच्या घरोघरी पोहोचला पाहिजेत असे उद्गार त्यांनी यावेळी काढले
उमाजी नाईकांविषयी सखोलशी माहिती दिली या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शिंदे तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे जय मल्हार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप भोईटे श्रीगोंदा सोसायटीचे संचालक अनिल राव ननवरे ज्येष्ठ नेते अशोकराव बगाडे सुशील जी खराडे युवा अध्यक्ष जय मल्हार संघटना लखन ननवरे नामदेव ननवरे पांडुरंग मदने बोला खराडे गणेश गांजुरे विठ्ठल ननवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते