श्रीगोंदा, ता. ५ : शहरातील मांडवगण रोडलगत असलेल्या आळेकर मळ्यातील सचिन रोही आणि त्यांच्या परिवाराने सुरू केलेल्या शिवांश मशरूम फार्मचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी दुपारी ३ वाजता करण्यात आला.
मशरूम फार्म हा व्यवसाय चालवण्यास वडील पोपट रोही यांच्या मार्गदर्शनाखाली आई सौ. शशिकला रोही, सौ.स्वामिनी सचिन रोही, पत्रकार नितीन रोही, सौ.पूजा नितीन रोही,विनोद वाघमारे शुभम मालकर हे सर्व जण व्यवसाय संभाळतात.
यावेळी खासदार निलेश लंके, नगराध्यक्ष मनोहर पोटे, दौलतराव जाधव (पोलीस निरीक्षक कर्जत),प्रतापसिंह पाचपुते, मा.जि.प.सदस्य अनिल ठवाल, सतीश कुमार (सिनियर मॅनेजर कॅनरा बँक व सर्व स्टाप), नगरसेवक शहाजी खेतमाळीस, संजय खेतमाळीस, शिवाजी शेळके,दादासाहेब औटी,अनिल औटी,विकास बोरुडे, पत्रकार चंदन घोडके, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसोडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पिटर रणसिंग, सचिव अमोल झेंडे, सतीश दांडेकर (कॅनरा बँक कॅशियर), बाळासाहेब दांडेकर,सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीचे महादेव पारे सर,महेंद्र पारे सर, मशरूम उद्योजक तात्या लखे,अशोक लबडे, वैभव झिंजाडे, प्रशांत आळेकर, सुनील रोही उपस्थित होते.
चौकट,
ऑयस्टर मशरूमचे फायदे :
पोषक तत्त्वांनी भरपूर प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे (B आणि D), आणि खनिजे (जसे की लोह, कॅल्शियम) यांचा समृद्ध स्रोत.
कोलेस्टेरॉल कमी करते हृदयासाठी उपयुक्त, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते.
प्रतिकारशक्ती वाढवते – अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
कर्करोगविरोधी गुणधर्म काही तत्त्वे कर्करोगाच्या वाढीला आळा घालतात.
वजन कमी करण्यास मदत कमी कॅलरी व उच्च फायबरमुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रित राहते.
डायबेटिससाठी फायदेशीर रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.
हाडे मजबूत करते – कॅल्शियम व जीवनसत्त्व D मुळे हाडे बळकट होतात.
ऑयस्टर मशरूम आरोग्यासाठी उपयुक्त व नैसर्गिक सुपरफूड आहे.