श्रीगोंदा : भाजपा सदस्यता अभियान २०२५ आढावा बैठक माउली संपर्क कार्यालयात संपन्न..!

भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अंतर्गत श्रीगोंदा-अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघ भाजपा सदस्यता अभियान २०२५ आढावा बैठक माउली संपर्क कार्यालयात संपन्न

श्रीगोंदा, ता. ६ : भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अंतर्गत भाजपा सदस्यता अभियान २०२५ संपूर्ण राज्यामध्ये राबविणे सुरु आहे. मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आजपर्यंत एक कोटी सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे. राज्यातील १.५ कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व मतदारसंघात आढावा बैठक होत आहेत.

त्याचाच भाग म्हणून श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघ सदस्य नोंदणी आढावा बैठक आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली मा.आमदार बबनरावजी पाचपुते यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी आयोजित केली होती. भाजपा संघटन पर्वाअंतर्गत सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांना किमान १ हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आमदार पाचपुते यांनी बैठकीमध्ये उपस्थित सर्वाना दिले आहे.

भविष्यात सर्व निवडणुकीत, पदावर, भाजपा कार्यकारणीत, विशेष कार्यकारी अधिकारी, विविध शासकिय समिती सदस्य, तालुका व जिल्हा स्तरावर पक्षांतर्गत काम करण्याची संधी हवी असेल त्यांनी वैयक्तिक किमान १ हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले. एक हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर विक्रम भोसले यांचा आमदार पाचपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
36.4 ° C
36.4 °
36.4 °
15 %
4.9kmh
4 %
Fri
36 °
Sat
38 °
Sun
39 °
Mon
40 °
Tue
40 °
error: Content is protected !!