श्रीगोंदा : मेजर अण्णासाहेब गोडसे यांचा सेवापुर्ती सोहळा कोळगाव मध्ये संपन्न

श्रीगोंदा, ता. ६ : कोळगाव येथील मेजर अण्णासाहेब भाऊसाहेब गोडसे हे ३१ जानेवारी २०२५ रोजी चोवीस वर्षे देशसेवा पूर्ण केली. आपल्या मायभूमी म्हणजेच कोळगाव येथे त्यांचे आगमन होताच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात त्यांची मिरवणूक काढून आजी-माजी सैनिक संघटना व ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान केला.

कोळगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले मेजर अण्णासाहेब गोडसे यांनी संघर्षमय जीवन जगून २४ वर्ष देश सेवा केली या कालावधीत त्यांनी हवालदार एसीपी व नायब पदापर्यंत मजल मारली. मेजर गोडसे यांना शालेय जीवनापासूनच जे सेवेची आवड होती म्हणून त्यांनी भारतीय भूमीचे रक्षण करण्यासाठी सैनिकी पेशा स्वीकारला.

मेजर अण्णासाहेब गोडसे यांचे कोळगाव या ठिकाणी आगमन झाल्यानंतर कोळगाव ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात फटाके वाजून त्यांचे स्वागत केले श्री कोडाई देवी मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले त्यानंतर कोळगाव येथील कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या स्मारकास वंदन केले मेजर गोडसे यांचा आजी-माजी सैनिक संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांची उघड्या जीपमधून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीनंतर कोळगाव ग्रामपंचायत येथे त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी अनेक जणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या राहत्या घरी ह भ प होळकर महाराज यांनी देश सेवेबद्दल महती सांगून कीर्तन रुपी सेवा दिली.

कोळगाव ग्रामपंचायत मध्ये झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच पुरुषोत्तम लगड हे होते. तसेच सोसायटी चेअरमन हेमंत नलगे, उपसरपंच नंदू लगड, मेजर भाऊसाहेब गोडसे, दत्तात्रय जगताप, अशोक जगताप, पीएसआय राजेंद्र पानसरे, भगवान मखरे, अशोक भापकर, वडील भाऊसाहेब, आई लक्ष्मीबाई, पत्नी छायाताई व भाऊ नागेश गोडसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर अशोक जगताप यांनी केले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.5 ° C
24.5 °
24.5 °
81 %
7.4kmh
100 %
Sun
26 °
Mon
27 °
Tue
25 °
Wed
25 °
Thu
28 °
error: Content is protected !!