श्रीगोंदा, ता. १० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसंदर्भात बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट चे परिक्रमा सायन्स कॉलेज काष्टी या केंद्रावरती नुकतीच सर्व पर्यवेक्षक व केंद्रसंचालक सहाय्यक केंद्रसंचालक यांची बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये परिक्रमा सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. इथापे पी. ए.यांनी अतिशय सूक्ष्म नियोजनामध्ये मंडळाच्या निर्देशानुसार परीक्षा पार पाडण्यासाठीच्या कडक सूचना सर्व पर्यवेक्षकांना दिल्या. यावेळी श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मखरे सर या केंद्रासाठी नियुक्त केंद्र संचालक काकडे सर व सर्व पर्यवेक्षक उपस्थित होते.
मंडळाने ठरवून दिलेल्या निकषानुसार कॉफीमुक्त अभियांतर्गत परीक्षा पार पाडण्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह बबनराव पाचपुते तसेच संस्थेच्या अध्यक्षा डॉ.प्रतिभाताई बबनराव पाचपुते व संस्थेचे सचिव तथा तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.