श्रीगोंदा, ता. १२ : महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला. यशवंत, गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा सन्मान या समारंभात करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव प्राचार्य बंडू पवार उपस्थित होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस होते. आपले महाविद्यालय अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतून उभे राहिले आहे. युवकांनी अभ्यास करून मोठे व्हावे असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी प्राचार्य बंडू पवार म्हणाले की, तरुणांनी कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन आपल्या जीवनात यशस्वी व्हावे. अभ्यासातून आपले कर्तुत्व सिद्ध करा. या समारंभासाठी सुप्रसिद्ध रानकवी तुकाराम धांडे यांनी बहारदार शब्दात निसर्ग कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या माय मातीशी घट्ट नाते ठेवावे. निसर्गावर व शेतीवर प्रेम करा.
असा संदेश त्यांनी दिला. या समारंभाचे प्रमुख वक्ते डॉ.अरुण शिंदे म्हणाले की, सुंदर आनंददायी आयुष्य जगण्यासाठी आरोग्याची काळजी घ्या असे ते म्हणाले परिक्रमा संकुलाच्या प्रमुख डॉ. प्रतिभाताई पाचपुते म्हणाल्या की, युवकांनी याच काळात कष्ट करावे. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावा. माजी आमदार राहुल जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासातून आपले व्यक्तिमत्व प्रकट करा आणि मनसोक्त जगा असा संदेश त्यांनी दिला.
उपविभागीय अधिकारी नवनाथ बोडके यांनीही मोलाचे विचार व्यक्त केले.वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांनाही उदंड प्रतिसाद लाभला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडके म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यक आहे. या समारंभासाठी कुंडलिकराव दरेकर इतर मान्यवर मंडळी, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी केले. अहवाल वाचन डॉ. बापू देवकर, प्रा. कल्पना बागुल, प्रा. संजय डफळ यांनी केले. समारंभासाठी महावीर पटवा, कुंडलिकराव दरेकर, उपनगराध्यक्ष ज्योतीताई खेडकर, राजू गोरे, सतीश मखरे, पिटर रणसिंग, रवीशेठ दंडनायक ,प्राचार्य दिलीप भुजबळ, मुख्याध्यापिका गीता चौधरी, नितीन अण्णा डुबल , प्रा. सौ. सुनीता सोनावळे , रघुनाथ लबडे, डॉ. प्रकाश साळवे, डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात इत्यादी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. शहाजी मखरे, डॉ. राम ढगे यांनी केले.