जैद जकाते, प्रतिक जगताप यांच्याकडून राष्ट्रीय मानवंदना
श्रीगोंदा, ता. १२ : भारत स्काऊटस् आणि गाईडस संस्थेच्या ७५ वर्षपूर्ती – हिरक महोत्सव निमित्त त्रीची, तामिळनाडू येथे डायमंड ज्युबली राष्ट्रीय जांबोरीत महादजी शिंदे विद्यालयाच्या कर्मवीर भाऊराव पाटील पथकातील ८ स्काऊटस् व स्काऊट मास्टर विकास लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत सक्रिय सहभाग घेतला.
यात आर्यन वाल्मिक आवचर, अमित संजय खेडकर, प्रतिक कैलास जगताप, जैद आरिफ जकाते, आदित्य दिगंबर गुंजाळ,विराज सुधीर साबळे, उत्कर्ष संजय राऊत, संकेत संदीप दरेकर हे मार्चपास्ट, ग्राँड कॅम्प फायर, लोकनत्य, फुडप्लाजा, कँम्प क्राप्ट, ईथेनिक शो, पिजंट शो (शोभायाञा), फिजीकल डिस्पले, स्किल ओ रामा ह्या स्पर्धेत चमकले व प्रथम पारितोषिक पटकावले.
जांबोरी उद्घाटन सोहळ्यानिमित्त मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी जैद जकाते व प्रतिक जगताप यांची निवड झाली. महाराष्ट्र राज्य हे सर्वच बाबतीत महान आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या स्काऊटस् गाईडस् व स्काऊटर,गाईडर यानी सिध्द केले. ११ स्पर्धेत प्रथम क्रमाक, ८ स्पर्धेत द्वितीय तर एका स्पर्धेत तृतिय क्रमाकांचे पारितोषिक मिळवून महाराष्ट्र राज्याने तामिळनाडुत आपला ठसा उमटवला. श्रीलंका,नेपाळ, मालदिव ह्या शेजारी देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहुन महाराष्ट्राची कला व संस्कृतीचा आनंद घेतला.
स्काऊटस् जांबोरीचा आत्मा असलेल्या स्काऊट गाईडनी जांबोरी यशस्वी केल्याबद्दल विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,अहिल्यानगर भारत स्काऊटस् आणि गाईडस् चे जिल्हा मुख्य आयुक्त शिक्षणाधिकारी (प्राथ.) भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोकराव कडूस,गट शिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र,जिल्हा संघटन आयुक्त अरुण पेशकार, सोनाक्षी तेलंगे, प्राचार्य दिलीप भुजबळ, पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे यांनी अभिनंदन केले.