श्रीगोंदा, ता. १४ : श्रीगोंद्याचे पाटील श्रीमंत महादजी शिंदे यांचा वारसा श्रीगोंदे शहराला आहे.शिंदे घराण्यातील वीरांचा वारसा असलेले शहरातील ऐतिहासिक वास्तू शिंदे राजवाडा याचे जतन, संवर्धन आणि साफसफाई करण्याची मागणी करत शहरातील इतिहासप्रेमी मंडळाने महादजी शिंदे यांचा स्मृतीदिन शिंदे वाड्यासमोर साजरा केला.
श्रीगोंदे शहरातील ऐतिहासिक शिंदे राजवाड्या समोर श्रीमंत महादजी शिंदे यांचा स्मृतीदिन १२फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला राजवाड्याच्या भव्य प्रवेश द्वार पूजन शिवदुर्ग संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले. शिंदे घराण्याच्या काळात श्रीगोंदे गावचा विकास झाला. तत्कालीन वेळी गावाचे वाडे,वेसी,तटबंदी मंदिराची निर्मिती शिंदें घराण्याच्या काळात झाली.
शिंदे घराण्याचा शेवटचा वारसा असलेले दोन मजले असलेला भव्य राजवाडा अखेरच्या घटका मोजत आहे. वाड्यात झाडं,झुडपे वाढली आहेत. त्यात कुठंलिही स्वच्छता केली जात नाही.पावसाळ्यात शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने वाड्याची पडझड झाली आहे.शिंदे घराण्याचा पराक्रमी इतिहास सांगणाऱ्या वाड्याचे संवर्धन करावे,
शिंदे राजवाडा स्वच्छता करावी शाळेच्या प्रशासनाने माती लावून बंद केलेला दरवाजा पुन्हा उघडावा. आतील झाडे तोंडावीत किंवा इतिहास प्रेमी आणि गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा स्वच्छ करावा. वाडा राज्य संरक्षित स्मारक करावे, शिंदे घराण्याची माहिती या ठिकाणी लावावी अशी मागणी यावेळी सर्वांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी इतिहास प्रेमी मंडळाचे डॉ.विक्रम कसरे, निखील भागवत, शिवाजी साळुंके, अरविंद कासार, मनोज शिंदे, विनोद डोळस, प्रवीण मचाले, बापु गोसावी, शिवदुर्ग संवर्धनचे राजेश इंगळे, ऍड.गोरख कडूस,दक्ष नागरिक फाऊंडेशचे दत्ताजी जगताप,श्रीरंग साळवे, प्रतीक घाटे संदीप चाकणे, बाळासाहेब लवांडे आदीसह इतिहासप्रेमी उपस्थित होते.