श्रीगोंदा, ता. १४ : प्रा.राम शिंदे यांची विधान परिषद सभापती पदी निवड झाल्या बद्दल सत्कार समारंभाचे आयोजन चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विठ्ठलराव वाडगे यांनी दि. १३ रोजी केले होते, तसेच शेतकरी, महिला बचत गट मेळाव्याचे आयोजनही यावेळी केले होते.
यावेळी बोलताना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले मी आता योग्य जागी बसलो आहे आपल्या जिव्हाळ्याचा कुकडी प्रकल्प माझा आवडता विषय आहे पूर्वी प्रकल्पाच्या वरच्या भागातील नेते अध्यक्ष होते आपण खालच्या भागात होतो आता परिस्थिती बदलली मी सभापती आहे काळजी करू नका बंधारे भरण्यावर निर्बंध आले तसेच डिंभे – माणिकडोह बोगदा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असा विश्वास विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी बोलताना दिला.
सभापती प्रा. शिंदे म्हणाले वेळ बदलत असते पूर्वी आपण आणि श्रीगोंदा करानी संघर्ष केला आता पाट पाण्याचे प्रश्न सोडवू. शासकीय नोकरी मिळाली की नोकर वर्ग कुटुंब पुरता विचार करतात पण विठ्ठलराव वाडगे यांनी ग्रामसेवक पदाची नोकरीत स्वेच्छा निवृत्ती घेऊन धार्मिक तसेच शासनाच्या शेतकरी हिताच्या योजना महीला सक्षमीकरण,बाजार समिती या माध्यमातून मोठे योगदान श्रीगोंद्याच्या विकासात दिले आहे .
नामदेव महाराजांचे १८ वे वंशज ह.भ. प.ज्ञानदेव तुळशीदास महाराज नामदास यांनी बोलताना प्रा.राम शिंदे यांनी आपल्या ज्ञानाच्या आधारे यश मिळवत चांगले काम केले आता सभापती पदाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करताना पुढे म्हणाले विठ्ठलराव वाडगे हे वारकऱ्यांच्या समस्यावर मार्ग काढतात ते कृषि,आर्थिक,महीला बचत गट आदी क्षेत्रा बरोबर धार्मिक बाबतही मोठे योगदान आहे वाडगे यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर निवड व्हावी अशी मागणी केली.
आमदार विक्रम पाचपुते यांनी बोलताना प्रा.राम शिंदे यांनी आमदार प्रशिक्षण वेळी इंग्रजीतून भाषण करून आपले भाषेवरील प्रभुत्व दाखवले ही जिल्ह्यासाठी मानाची बाब आहे तसेच सभापती पदाच्या माध्यमातून कुकडी प्रकल्प मधील आवर्तन आणि डिंभे – माणिकडोह बोगदा बाबत लक्ष घालण्याची मागणी केली .आमदार विक्रम पाचपुते यांनी पुढे बोलताना विठ्ठलराव वाडगे यांना कोणता व्यवसाय केल्याने लोकांचे भले होईल तसेच तालुक्याचा विकास होईल याची नस माहीत आहे त्यांच्या यशाचे गमक त्यांनी आम्हा सर्वांना सांगावे त्यांचे कृषि,महीला सक्षमीकरण बाबतचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी विधान परिषद सभापती पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी व्याख्याते गणेश शिंदे ,देव गोपाल महाराज शास्त्री,यांनी विचार मांडले .
यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, पणन महासंघ अध्यक्ष दत्ता पानसरे,संत श्री.बाबा महाहंसजी महाराज, पंचायत समिती माजी सभापती शहाजी हिरवे,चैतन्य महीला बचत गटांची सहकारी पतसंस्था चेअरमन सौ.रुक्मिणी ताई वाडगे,शुभम वाडगे,रघुनाथ डफळ,अजय गावडे, शुभम वाडगे, सौ.सायली वाडगे, शिवाजीराव भोस,सुधाकर वांढेकर, दादा ढवाण, सौ.मेघना गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी शेतकरी आणि महीला बचत गट मेळाव्यात शासकीय योजनांची माहिती तसेच कृषि प्रक्रिया उद्योग आणि महीला गृह उद्योगाला चालना मिळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्तविक अण्णासाहेब गावडे यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.मेघना गावडे यांनी केले.