अग्निपंख कडून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान..!

अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा ते चौंडी ६५ किमीची प्रेरणा सायकल वारी केली.

श्रीगोंदा, ता. २८ : श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा ते चौंडी ही ६५ किमीची प्रेरणा सायकल वारी काढली आणि कोणताही राजाश्रय नसताना सरपंच ते विधानपरिषदेचे सभापतीपदा पर्यंत प्रवास करणारे प्रा राम शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यापूर्वी सायकल पटूंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारकास भेट देवून मानवंदना दिली

बुधवारी चौडी (ता जामखेड) येथे झालेल्या कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापतीपदी प्रा. राम शिंदे व स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा माजी आमदार बबनराव पाचपुते वीरपत्नी रंजना काळे मोहीनी म्हस्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुरुवातीला सायकल पटू गणेश श्रीराम यांच्या पत्नी उर्मीला श्रीराम यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. श्रीगोंदा येथे सायकल वारी शिवदुर्गचे संघटक सचीन भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला.

प्रा राम शिंदे म्हणाले की सामान्य कुंटुबातील एखाद्या कार्यकर्त्यांला सरपंच पदापासून विधान मंडळातील उच्च पदा वर पोहचण्याचा प्रवास हा सध्याच्या काळात सोपा राहिलेला नाही. पण कुठेतरी जनमाणसाचे आर्शीवाद कामी आले

राजकिय जीवनात माझे अनेक सत्कार गौरव झाले अग्नीपंख टीम मधील शाळकरी मुल महिला जेष्ठ नागरीक यांनी सायकल वर येऊन माझा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव हे आयुष्यात विसरु शकणार नाही

मी अग्नीपंख फौंडेशन जे उपेक्षित घटकांसाठी निस्वार्थ भावनेने काम करीत हीच प्रेरणा घेऊन माझी कार्यपद्धती चालू असते भविष्यात अग्नीपंख सहकार्य करणार आहे असेही प्रा राम शिंदे म्हणाले.

माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले कि प्रा राम शिंदे हे भाग्यवान आहेत कमी वयात मोठी उंची गाठली आहे. आई वडील अशिक्षित, कुणाचा आधार नसताना मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. अग्नीपंख फौंडेशनने योग्य लोकप्रतिनिधींचा सन्मान केला आहे. अग्नीपंख टीम निस्वार्थ भावनेने काम करत आहे.

यावेळी नवनाथ खामकर यांचेही भाषण झाले प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केले यावेळी वृध्देश्वर मल्टीस्टेटचे अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे, राजेंद्र म्हस्के गणेश काळदाते भाऊसाहेब कोळपे बाळासाहेब गांधी महेश चौधरी शितल धुमाळ उपस्थित होते. सुत्रसंचलन विशाल चव्हाण तर आभार गोपाळराव डांगे यांनी मानले.

सहभागी सायकलपटू

सिध्देश रणसिंग आरोही डांगे राजनंदीनी रसाळ शिवन्या डांगे संपदा खामकर सानिया ससाणे रेश्मा डांगे गौरी कोहळे मनिषा काकडे संतोष जाधव अमोल गव्हाणे अॅड संपतराव इथाटे नवनाथ दरेकर सुरेश खामकर देविदास खेतमाळीस दिपक साबळे सागर पवार नवनाथ खामकर गोपाळराव डांगे जनार्दन घोडेकर किसन वऱ्हाडे मच्छिंद्र लोखंडे

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
38.5 ° C
38.5 °
38.5 °
13 %
3.9kmh
0 %
Fri
39 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
40 °
Tue
41 °
error: Content is protected !!