शिबिराचे आयोजन श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय व आर बी एस के पथक यांच्यामार्फत करण्यात आले
श्रीगोंदा, ता. १ : आज दिनांक १ मार्च २०२५ रोजी श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय म्हणजेच ज्ञानदीप स्कूल या ठिकाणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत विशेष मोहिमेचे शुभारंभ झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोकरे सर व ज्ञानदीप विद्यालया चे मुख्याध्यापक आनंदकर सर उपस्थित होते तसेच विद्यालयातील प्राध्यापक वर्ग पण उपस्थित होते
या कार्यक्रमाची सुरुवात उत्साहाने झाली या शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा व आर बी एस के पथक श्रीगोंदा यांच्यामार्फत करण्यात आले, या कार्यक्रमाला डॉ. अभिजीत तीवाटणे यांनी प्रस्तावना केली , वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोकरे सर यांच्यातर्फे मुख्याध्यापक आनंदकर सर यांच्या सत्कार करण्यात आला व विशेष आभार मानले पर्यवेक्षिका सौ. खेतमाळीस मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला. या मोहिमे मध्ये विद्यालयातील सर्व उपस्थित विध्यर्थी ची तपासणी करण्यात आली
या मोहीम शुभारंभ साठी गट शिक्षण अधिकारी मछिदंर साहेब व तालुका आरोग्य अधिकारी डांगे मॅडम उपस्थित होते या शिबिराचे आयोजन करण्यासाठी वैद्यकीय अधिक्षक आकाश कोकरे सह नोडल अधिकारी आरबीएसके डॉ. काळे सर ,डॉ तीवाटणे सर, डॉ आनंदकर सर, डॉ पाबळे मॅडम ,डॉ निमसे मॅडम, डॉ कोंढापुरे मॅडम व सर्व आरबीएसके फार्मासिस्ट आणि सिस्टर यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आभार फार्मासिस्ट अमित हिरणवाळे यांनी मानले.