श्रीगोंदा, ता ३ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा तालुका व हिंदुहदयसम्राट प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंती उत्सव समितीची बैठक आज सोमवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी संपन्न झाली.
या बैठकीमध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना जेष्ठ नेते सुरेश देशमुख व उपाध्यक्षपदी संभाजी घोडके सचिव पदी रघुनाथ सूर्यवंशी खजिनदार पदी नितीन लोखंडे सहसचिवपदी शिवाजी समदडे सहखजिनदारपदी संतोष चिकलठाणे यांची निवड सर्वानुमते शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे महिला आघाडी तालुकाप्रमुख नूतन ताई पानसरे हरिभाऊ काळे रावसाहेब डांगे निलेश साळुंके अशोक पानसरे संतोष सोनवणे राजू तोरडे शरद नागवडे जमील भाई शेख सुदाम सावंत जनाबाई गायकवाड राहुल नवले सुशांत भंडारी गणेश लाटे शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी शिवभक्त शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.