टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि. २१ सप्टेंबर २०२२ : रविवार दि.१८ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा येथे २८ वी जिल्हास्तरीय खुली मार्शल आर्ट स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या क्रिडा संकुलामध्ये संपन्न झाली.स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील २७३ खेळाडूंनी सहभाग घेत सुवर्ण ,रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट केली.
स्पर्धेचे उदघाटन नगराध्यक्षा शुभांगी ताई पोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतिषश्चंद्र सूर्यवंशी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना, “आजच्या काळामध्ये शरीर सदृढ ठेवण्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी, जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणण्यासाठी कराटे प्रशिक्षण आवश्यक असल्याचे सांगत आनंदकर सर गत ३० वर्षांपासून देत असल्येल्या विनामूल्य कराटे प्रशिक्षणाबद्दल कौतुक करत जास्तीस्त जास्त खेळाडूंनी स्वतःला आत्मनिर्भर बनविण्यासाठी कराटे प्रशिक्षण घ्यावे असे प्रतिपादन केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी सुपेकर साहेब, उपनगराध्यक्षा जोती ताई खेडकर, नगरसेविका मनीषा ताई वाळके, नगरसेवक संतोष क्षीरसागर, एस.पी.गोलांडे सर, क्रीडा शिक्षक चोरमले सर, गिरमकर सर यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
- स्पर्धेमध्ये श्रीगोंदा तालुक्याने २१ सुवर्णपदकांसह प्रथम, १९ सुवर्णपदकांसह कर्जत तालुक्याने द्वितीय तर नगर तालुका संघाने १७ सुवर्णपदकांसह तृतीय क्रमांक पटकावला.
सदर स्पर्धा दि इंडियन पॉवर मार्शल आर्ट असो.महाराष्ट्राचे अध्यक्ष ग्रँडमास्टर संजय आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मास्टर अनिल दुबळे, समीर मचे, महेश आनंदकर, अतुल जाधव, गौरव धाडगे, ऋषिकेश घोडेकर, वैभव क्षीरसागर, स्वप्नील गायकवाड, संजोग चव्हाण, सुप्रिया सिदनकर, सायली कांबळे, पंपिंता बिस्वास यांनी परिश्रम घेतले.
स्त्रोत(आयोजित स्पर्धा)