राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट लेखा परीक्षक पुरस्कार संतोष तरटे यांना प्रदान..!

संतोष तरटे यांनी राज्यस्तरीय प्रथम उत्कृष्ट लेखापरीक्षक पुरस्कार सहसचिव एस बी पाटील साहेब(सहकार खाते), सोनुने उपआयुक्त साहेब (धर्मादाय विभाग) आणि संघटना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्विकारला

श्रीगोंदा, ता. ४ : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, एस बी पाटील सहसचिव सहकार, सहकार आयुक्त तावरे, धर्मदाय उपआयुक्त सोनुने यांच्या उपस्थितीत दिनांक २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ हे दोन दिवसीय राज्यस्तरीय लेखापरीक्षकांचे अधिवेशन नाशिक येथे पार पडले. यावेळी संतोष तरटे यांना राज्यस्तरीय प्रथम उत्कृष्ट लेखापरीक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या अधिवेशनामध्ये सहकार कायद्यातील झालेले बदल आणि लेखापरीक्षकांच्या जबाबदार्‍या या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लेखापरीक्षकांनी केलेल्या मागील कामाचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले.

यावेळी मागील वर्षीच्या उल्लेखनीय कामाबद्दल राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार संतोष जनार्दन तरटे श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांना सहसचिव साहेब(सहकार खाते), उपआयुक्त साहेब (धर्मादाय विभाग) आणि संघटना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील लेखापरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक पुरी साहेब आणि श्रीगोंदा सहाय्यक निबंधक थोरात साहेब यांनी विशेष अभिनंदन केले.

चौकट
हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार माझ्यासह श्रीगोंदा तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे या कामासाठी अनेक वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभले या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन निश्चितपणे यापुढे सर्वोत्कृष्ट काम करण्याचा माझा प्रयत्न राहील – संतोष तरटे, लेखा परीक्षक श्रीगोंदा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.8 ° C
23.8 °
23.8 °
79 %
4.3kmh
100 %
Thu
24 °
Fri
27 °
Sat
30 °
Sun
29 °
Mon
28 °
error: Content is protected !!