श्रीगोंदा, ता. ५ : तालुक्यातील मढेवडगावचे सुपुत्र तथा रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाचे माजी विद्यार्थी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैया वाबळे यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार सदस्य पदी निवड करण्यात आली. दि. २९ जानेवारी रोजी झालेल्या ऑफलाइन /ऑनलाईन सहविचार सभा क्र. १ नुसार रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय चेअरमन आ. आशुतोष काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळावर निमंत्रित सदस्य पदासाठी ही निवड बिनविरोध झाली.
रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार संस्थेच्या विविध शाखा विकासासाठी योगदान दिल्याबद्दल संस्थेने त्यांच्या कामाची दखल घेऊन आज रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय चेअरमन आमदार आशुतोष काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहविचार सभेत उत्तर विभागाच्या सल्लागार मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे व सर्व सेवक वृंदांनी शुभेच्छा दिल्या तसेच यापुढेही संस्थेच्या विविध विकास कामात योगदानाची अपेक्षा व्यक्त केली.
या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आ.राहुल जगताप, जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडी साहेब व माननीय तोरणे साहेब पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी स्मितल भैया वाबळे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत