श्रीगोंदा, ता. ९ : मुलींना चांगले शिक्षणाबरोबर चांगले संस्कार करावेत तसेच मुलींचे लग्न लवकर नकरता अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर करावे मुलगी शिकली तर प्रगती होते त्यामुळे मुलींना शिक्षण देणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी केले. ग्रामिण विकास केंद्र, जामखेड व कोरो इंडीया मुंबई सचलित सावित्री महिला सक्षमीकरण, श्रीगोंदा व तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने महिला दिनी दि.८ मार्च २०२५ रोजी भिंगान, ता. श्रीगोंदा येथे मुक्त संवाद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भिंगान येथे एकलव्य सभामंडप येथे मुक्त संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भल्ल समाजाच्या महिलांना जातीच्या प्रमाणपत्राचे वाटप व रेशनकार्ड वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनिषा शिंदे तर कार्यक्रमाचे उद्घाटक अॅड. सुनिता पलिवाल यांनी केले
पुढे बोलताना न्यायाधीश शेख म्हणाले पुरुषांनी कष्ट करुन त्यांनी दारु पिण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा कुटुंबातील व्यक्ती शिकली तर कुटूंब सुधारण्यास मदत होते त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी अॅड. विजया घोडके – जाधव, अॅड. साळूंके, मनिषा शिंदे, लता सावंत, पल्लवी शेलार, भिंगाण गावातील महिला, महसूल अधिकारी, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता शिंदे यांनी तर आभार रोहिणी राउत यांनी मानले.