श्रीगोंदा, ता. ११ : बिहार महाबोधी विहार मुक्त करुन विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्या अशा आशयाचे निवेदन तहसीलदार श्रीगोंदा यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,आम्हाला विश्वास आहे की तुमच्या सक्षम नेतृत्वाखाली बिहार सरकार सुरक्षित आणि समृद्ध हातात आहे. बोधगया, राजगीर, नालंदा इत्यादी बौद्ध धर्माशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांचे सुशोभीकरण, पाटणा येथील बुद्ध स्मृती पार्क, बोधगया येथील महाबोधी सांस्कृतिक केंद्र इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचे बांधकाम अशा अनेक विकासकामांसाठी बौद्ध जग तसेच संपूर्ण देश तुमचे आभारी आहे.
बोध गया मंदिर कायदा १९४९, हा बिहार सरकारने पारित केलेला कायदा आहे, तो एक विधान विषय आहे. तुमच्या नेतृत्वाखाली बिहारचे माननीय आमदार या कायद्याबाबत न्याय्य आणि सौहार्दपूर्ण तोडगा काढतील, ज्यामुळे देशातील आणि जगभरातील बौद्धांना न्याय मिळेल, अशी आम्ही पूर्ण आशा व्यक्त करतो युवर ऑनरने राज्य कारभाराचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून न्याय आणि समता दाखवली आहे. आम्हाला आशा आहे की, बुद्धगया महाविहाराच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण घटनात्मक अधिकारांचे (अनुच्छेद २५ आणि २६) उल्लंघन लक्षात घेता, तसाच न्याय बौद्ध समाजालाही दिला जाईल, बी टी बोधगया मंदिर कायदा १९४९ हा संविधानाच्या कलम १३ च्या पूर्णपणे विरुद्ध आहे. त्यामुळे आपण या प्रश्नाकडे लक्ष देऊन महाबोधी विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावे अशा आशयाचे भारतीय बौद्ध महासभा श्रीगोंदा तालुका शाखा व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असलेले निवेदन तहसीलदार यांना देणया आले.
कारवाई या निवेदनाच्या प्रति माननीय राष्ट्रपती, भारत सरकार, माननीय पंतप्रधान, भारत सरकार व डॉ भीमराव यशवंत आंबेडकर- राष्ट्रीय कार्याध्यक्ष, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदनावर संविधान जनजागृती प्रचारक आयु. रावसाहेब भाऊ घोडके तालुका अध्यक्षआनंद घोडके, आदरणीय गोरख तात्या घोडके भगवान ओहोळ सर, प्रमोद जाधव सर, नवनाथ रामफळे सर, पत्रकार अविनाश भाऊ घोडके,
अंजली भाऊसाहेब घोडके, मीना सुरज घोडके, ज्योती संदीप घोडके, नीलम आनंद घोडके,भाऊसाहेब अंकुश घोडके, युवराज केशव घोडके, विनोद विजय घोडके, सुनील भागचंद घोडके यांच्या सह्या आहेत.