श्रीगोंदा, दि. २० मार्च २०२५ : शहरातील कोथिंबीरे मळा शाळेत दुर्मिळ ऐतिहासिक नाणी व नोटांच्या संग्रहाचे प्रदर्शन पार पडले या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष बापूसाहेब गोरे, नानासाहेब कोथिंबीरे,प्रशांत गोरे,चंद्रकांत कोथिंबीरे यांचे हस्ते करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता लोखंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले कार्यक्रमासाठी सहशिक्षिका सुनिता बोरुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुमारे पाचशे सतरा वर्षांपूर्वीपासून आजपर्यंतच्या नोटा व नाणी तसेच ऐतिहासिक विविध वस्तूंचा संग्रह यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. गणेश दशरथ डेंबरकर यांनी आई वडिलांकडून प्रेरणा घेऊन हा वारसा जोपासला आहे. शालेय विद्यार्थ्यांना आपल्या ऐतीहासिक वारशाची माहिती व्हावी, त्यांच्या संग्रहकलेत वाढ होऊन चिकित्सक वृत्ती वाढावी म्हणून प्रत्येक शाळा, विद्यालयात अल्प मानधनात हे प्रदर्शन भरवितात.
कोथिंबीरे मळा शाळेत विद्यार्थ्यांसह पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रामदास ठाकर तसेच पत्रकार पीटर रणसिंग यांनी प्रदर्शनास भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू कोथिंबीरे, उपाध्यक्ष शनी धुमाळ, माता पालक संघाच्या अध्यक्षा अश्विनी कोथिंबीरे, उपाध्यक्षा मनिषा अनारसे, सिमा गोरे, जयश्री कोथिंबीरे तसेच धनराज कोथिंबीरे, आरिफभाई मालजप्ते,सागर कोथिंबीरे, वैभव कोथिंबीरे, झुंबर कोथिंबीरे, लक्ष्मण कोथिंबीरे, संतोष कोथिंबीरे आदि माता पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, गुणवतेसाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जात असल्यामुळे पालक या शाळेस भरभरून अर्थिक योगदान देत आहेत. यावेळी सर्वांनी मुख्याध्यापिका सुनिता लोखंडे, सहशिक्षिका सुनिता बोरुडे यांच्या कार्याचे कौतुक केले.