परिवर्तन मंडळ पॅनलचे सर्वच्यासर्व २१ उमेदवार विजयी
श्रीगोंदा, दि. २६ मार्च २०२५ : अहिल्यानगर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची व शिक्षकेतर सेवकांची असणाऱ्या सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक दि.२३ मार्च रोजी पार पडली त्यामध्ये परिवर्तन मंडळ व पुरोगामी मंडळ असे दोन पॅनल मध्ये लढत झाली. मावळत्या सत्ताधाऱ्यांवर मतदारांनी पाठ फिरवत विरोधी पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे २१ संचालक निवडून दिले त्यामुळे पंचवीस वर्षापासून एक हाती असलेली सत्तापालट झाले.
परिवर्तन मंडळ पॅनेलचे अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे,सुनील दानवे,लगड एम.एस. महेंद्र हिंगे, राजेंद्र कोतकर, बाळासाहेब भोर यांनी निवडणूकी मध्ये परिश्रम घेतले.
विजयी झालेले संचालाक :
अप्पासाहेब शिंदे,बाबासाहेब बोडखे,महेंद्र हिंगे,राजेंद्र कोतकर,बाजीराव अनभुले,सुधीर कानवडे, अतुल कोताडे,बालाजी गायकवाड , विजय पठारे,छबू फंडे, ,संभाजी गाडे,उमेश गुंजाळ,अप्पासाहेब जगताप,सुनील दानवे , किशोर धुमाळ,साहेबराव रक्टे,शिवाजी लवांडे, वैशाली दारकुंडे,वर्षा खिलारी, सूरज घातविसवे,अर्जुन वाळके यांना मतदारांनी संधी देत विजयी केले. सर्वच स्तरातून विजेत्यांचे अभिनंदन होत आहे.