छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा जागर करत शौर्यस्तंभ उभारण्याची समितीकडून मागणी
श्रीगोंदा, दि. ३० मार्च २०२५ : तालुक्यातील पेडगाव येथे संत मनोहर मामा भोसले महाराज यांच्या संकल्पनेतून बलिदान सप्ताह समितीची स्थापना करण्यात आली त्याचबरोबर धर्मवीरगड बलिदान सप्ताह समितीच्या वतीने दि.२६ ते २९ मार्च पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने विविध उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये रक्तदान, वृक्षारोपण, पादुका पूजन, अभंग, किर्तन, पोवाडे, पदयात्रा अशा स्वरूपाचे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. बलिदान सप्ताह समितीकडून या ठिकाणी शौर्यस्तंभ उभारण्याची मागणी होत आहे
त्याचप्रमाणे या किल्ल्याचे नाव बहादूरगड असून याचे धर्मवीरगड असे नामकरण करून त्याचा शासनाने जीआर काढावा अशी ही मागणी समितीच्या वतीने करण्यात आली. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ झाला होता त्यांचे या ठिकाणी रक्त सांडले त्यामुळे वढू बुद्रुक प्रमाणेच या भूमीचेही महत्त्व खूप मोठे आहे शासनाने या गडाकडे लक्ष देणे गरजेचे आहे महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे असे समितीच्या सदस्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी टायगर ग्रुप चे तानाजी जाधव, अनिकेत घुले, धनाजी साखळकर, दीपक अण्णा काटे, उदयजी देशमुख, माऊली चव्हाण, अमित मोहिते, शेखर मोडक, अशोक भाऊ ढवळे, नरेंद्र सांगळे, बापू तात्या गोरे, अशोक भाऊ खेंडके, नानासाहेब कोथिंबिरे, आप्पासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.