अग्नीपंख फौंडेशनकडून सायकलिंची भेट मिळालेली पाहून मुकबधीर शिंदे बहीणींच्या चेहऱ्यावर हास्य उमलले
श्रीगोंदा,दि. ३१ मार्च २०२५ : दररोज सहा किमीची पायपीट करुन श्रीगोंदा येथील राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात शिकणाऱ्या कावेरी मोहन शिंदे व मनिषा मोहन शिंदे या बहीणींना अग्नीपंख फौंडेशनने सायकली भेट दिल्या पायपीट संपल्याने शिंदे भगींनीच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आहे.
ही सायकल भेट शुक्रवारी गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ दरेकर यांचे हस्ते देण्यात आली. गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र म्हणाले की अग्नीपंख फौंडेशन हे जिल्हा परिषद शाळा विद्यालये व विद्यार्थ्यांना बळ मिळावे म्हणून सकारात्मक दृष्टिकोन काम करीत आहेत शिंदे भगीनींना सायकलीची खुप गरज होती ही गरज पुर्ण झाल्याने मुकबधीर असलेल्या मनिषा व कावेरी ह्या निश्चित आपले ध्येय गाठतील असा विश्वास आहे.
यावेळी उपमुख्याध्यापिका नीलिमा कातोरे, पर्यवेक्षक बी. आर. शिंदे , महादेव घोडके अमोल गव्हाणे संजय राऊत उपस्थित होते. गुरुकुल विभागाचे प्रमुख किरण शिंदे यांनी सुत्रसंचलन केले.
चौकट
शिंदे भगिनी ह्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील असून आई वडील मोलमुजरी करतात दिव्यागांचे विशेष शिक्षक रोशन घोडके व सोनाली अकोलकर यांनी सहा किमी पायी प्रवास करुन शिक्षण घेणाऱ्या कावेरी व मनिषा शिंदे या बहीणींना सायकली दिल्या तरी निश्चित त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि अग्नीपंख फौंडेशन तात्काळ सायकलीची व्यवस्था केली.