श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठानतर्फे सन्मान

विविध सण-उत्सव काळात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची शांतता आणि सौहार्दपूर्ण बंदोबस्ताची यशस्वी जबाबदारी

श्रीगोंदा, दि. ७ एप्रिल २०२५ : श्रीगोंदा येथील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा हिंदुहदयसम्राट प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध सण-उत्सवांचे काळात परिसरात शांतता व सौहार्द राखत अत्यंत कुशलतेने बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडल्याबद्दल त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.

संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सव, तिथीनुसार पार पडलेला शिवजयंती उत्सव, रमजान ईद, रामनवमी या सर्व सण-उत्सवांचे वेळेस पोलीस प्रशासनाने घेतलेले योग्य नियोजन, दक्षता आणि कार्यक्षमतेमुळे वातावरण उत्साही आणि शांततेत पार पडले. तसेच येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले जयंती मध्येही योग्य नियोजन राहीलच अशीच नागरिकांना खात्री आहे. अशा प्रकारच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा प्रतिष्ठानच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला.

या वेळी हिंदुहदयसम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दुतारे, चंदन घोडके, सुरेश देशमुख, अंकुश तुपे, संभाजी घोडके, शिवाजी समदडे, मयूर गोरे, अमर घोडके, नितीन लोखंडे, हरिभाऊ काळे, सागर खेडकर, सुशांत भंडारी, राजू तोरडे, गणेश लाटे, रघुनाथ सूर्यवंशी, जमीलभाई शेख, रोहिदास म्हस्के तसेच प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.3 ° C
24.3 °
24.3 °
76 %
7.7kmh
100 %
Wed
24 °
Thu
26 °
Fri
24 °
Sat
23 °
Sun
25 °
error: Content is protected !!